भक्तांना लागली चिंता : गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त होणे गरजेचे : आंदोलनानंतरच रस्त्यांच्या कामाला सुरुवात करणे खरोखरच दुर्दैवी
बेळगाव : गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात महापालिकेमध्ये स्थायी समितीची दोन वेळा बैठक झाली. त्यानंतर हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी काही प्रमाणात कामाला सुरुवात केली. मात्र, अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीमधील रस्त्यांवरील खाड्यांमधून गणरायांना आगमन करावे लागणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. शहरातील बऱ्याच ठिकाणी अर्धवट कामे आहेत. गोवावेस ते आरपीडी क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. अशाप्रकारे अनेक ठिकाणी कामे अर्धवट असल्याने ती गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार का? असा प्रश्न भक्तांतून उपस्थित होत आहे. अवघ्या 20 दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणेशाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू आहे. मात्र, सध्या रस्त्यावरील खाड्यांमुळे गणरायांचे आगमन खाड्यांतूनच होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसानेही विश्रांती घेतली असली तरी रस्त्यांची मात्र दुरवस्था झाली आहे. कोट्यावधीचा निधी वापरूनही रस्त्यांतील खड्डे व त्यातील धुळीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. याकरिता प्रशासनाने रस्त्यांची लवकरात लवकर दुऊस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मंडळांकडून समस्यांबाबत निवेदन
याबाबत काही मंडळांनी रस्ते दुरुस्त करण्यासाठी यापूर्वीच निवेदने दिली आहेत. सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत चर्चादेखील झाली. तातडीने ड्रेनेज व रस्त्यांची समस्या सोडवावी, असे यावेळी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. मात्र, हेस्कॉम वगळता इतर कोणत्याच विभागाची कामे सुरू नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील काही भागांमध्ये रस्त्यांचे काम पूर्ण झाले तरी काही भागांमधील कामे अर्धवट आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
समस्या निवारण्यात प्रशासनाला अपयश
स्मार्टसिटी अंतर्गत कोट्यावधी ऊपयांचा निधी शहराच्या विकासासाठी उपलब्ध होऊनही नागरिकांची खाड्यांपासून मुक्तता झालेली नाही. या समस्येचे निवारण करण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे. कित्येक वेळा निवेदने देऊन आंदोलने करण्यात आली आहेत. कणबर्गी रस्त्यावरील एका बाजूचा रस्ता वर्षभरापासून बंद आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर कणबर्गी येथील मुख्य रस्त्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रस्त्याच्या कामासाठी आंदोलन करावे लागले. आंदोलनानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ही खरोखरच दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. मुख्यत: गणेशोत्सवातही हीच परिस्थिती असल्यास भाविकांतून नाराजी व्यक्त होणार आहे.
रस्ता दुऊस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष
मुंबई, पुण्यानंतर बेळगावात भव्यदिव्य असा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. त्यामुळे सुसज्ज रस्ते निर्माण करण्यासाठी प्रशासनाने गांभीर्य घेणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही. मागील अनेक वर्षांपासून या मागणीला सकारात्मक असे काहीच दिसून येत नाही. शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. मात्र, या खड्डेमय रस्त्यांकडे मनपाने दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे. सध्या गणेशोत्सव मंडळांनी विविध ठिकाणी गणेशमूर्ती सांगितल्या आहेत. खड्यातून गणेशमूर्ती नेताना त्यांना इजा पोहोचू नये याची काळजी घेण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते तत्पर असतात. मात्र, तरीही खाड्यांमधून जाताना गणेशमूर्तींना इजा पोहोचण्याच्या घटनाही अधिक घडतात. ज्या ठिकाणी खड्डे पडलेले असतात, त्या ठिकाणी महानगपालिकेच्यावतीने पावसाळ्यापूर्वी पॅचवर्क करण्यात येते. परंतु ते करताना योग्य ती काळजी घेतली जात नाही. यामुळे पहिल्याच पावसात खड्डे आपले पूर्वऊप धारण करतात.
ख•dयांमुळे वाहने नादुऊस्त होण्याच्या प्रकारांमध्येही वाढ
काही रस्त्यांचे काम अलीकडेच पूर्ण झाले आहे. या रस्त्यांवरदेखील खड्डे पडल्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत आहे. खाड्यांमुळे वाहनधारकांना आणि नागरिकांनाही समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा खड्यांचा अंदाज न आल्यामुळे वाहनांचे लहान सहान अपघात होतात. तसेच खाड्यांमुळे वाहने नादुऊस्त होण्याच्या प्रकारांमध्येही वाढ होते. खड्डे बुजविण्यासाठी कोट्यावधी ऊपयांचा निधी खर्ची घालण्यात येतो. मात्र, नियोजनाअभावी हा निधी वाया गेला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









