सासष्टीतील ‘प्रशासन तुमच्या दारात’ उपक्रमात पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे आश्वासन ः हा एकवेळा कार्यक्रम ठरणार नाही
मडगाव ; पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सासष्टीतील ‘प्रशासन तुमच्या दारी’ कार्यक्रमात सहभागी होऊन अधिकाऱयांसमोर जनतेने उपस्थित केलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. हा एकवेळचा कार्यक्रम ठरणार नसून लोकांच्या समस्या निश्चित सोडविण्यात येतील, असेही आश्वासन त्यांनी दिले. मडगावातील या कार्यक्रमाला भाजपचे आमदार आलेक्स सिकेरा व उल्हास तुयेकर, अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा हे उपस्थित होते. खंवटे हे पर्यटनमंत्री असल्याने त्यांना पर्यटनाशी संबंधित अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला. जलक्रीडाचालकांनी मांडलेल्या समस्यांसह समुद्रकिनारी सीसीटीव्ही कॅमेऱयांची अनुपस्थिती, तरुणांना नोकऱया उपलब्ध न होणे आदी प्रश्न यावेळी मांडण्यात आले. एक नागरिकाने तर बहुतेक नोकऱया वाळपई व इतर भागांता कशा जातात याचे आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कार्यक्षम बनवा
मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी मंत्र्यांना निवेदन देऊन आपत्ती व्यवस्थापन कक्षाला अधिक कार्यक्षम बनवण्याच्या दृष्टीने सरकार आगामी अर्थसंकल्पात तरतूद करेल याची खात्री करावी, अशी सूचना केली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. वाहने, कामगार इत्यादींची त्यांना गरज असल्याचे शिरोडकर यांनी नजरेस आणून दिले.
आमदार व्हेंझी व्हिएगसकडून निवेदन सादर
बाणावलीचे आमदार व्हिएगस यांनीही पर्यटनमंत्र्यांना निवेदन सादर केले. त्यात सासष्टी किनारपट्टीवरील निकामी झालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयांचा विषय मांडण्यात आलेला आहे. ते म्हणाले की, भेट देणाऱया पर्यटकांना सुरक्षा देण्यात कॅमेरे अपयशी ठरले आहेत. पारंपरिक मच्छीमार आणि जलक्रीडाचालक पेले फर्नांडिस यांनी जीईएल सेवा जलक्रीडाचालकांवर लादू नये, अशी विनंती केली. बाणावली किनाऱयाला मच्छीमार आणि जलक्रीडाचालकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आशियामध्ये तिसरे स्थान मिळाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दाखल्यांबाबत गैरसोयीकडे वेधले लक्ष
पत्रकार अरविंद टेंगसे यांनी मामलेदार कार्यालय निवासी दाखल्यासाठी परत परत कागदपत्रांचा आग्रह का धरते, असा प्रश्न उपस्थित केला. कार्यालयाने निवासी दाखला महिन्यापूर्वी जारी केलेला असला, तरी नव्याने देताना त्यापूर्वी दिलेली कागदपत्रे ग्राहय़ धरली जात नसल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. यावेळी मामलेदारांनी जीईएलद्वारे चालवले जाणारे नागरी सेवा केंद्र दरवेळी नवीन दस्तऐवजांसाठी आग्रह धरत असल्याचे स्पष्टीकरण दिले. तेव्हा मागील माहितीच्या आधारे दाखला देण्याची तरतूद आहे, असे टेंगसे यांनी नजरेस आणून दिले. दोन दिवसांत जन्मदाखले दिले जातील असे सांगितले जाते, तरी उपनिबंधक कार्यालयास त्यासाठी सुमारे एक आठवडा लागतो, याकडे काहींनी लक्ष वेधले. भाजपाया अनुसूािात जमाती र्मो नेते अँथनी बार्बोझा यांनी आदिवासी समाजालाही दाखल्यांया बाबतीत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, हे नजरेस आणून दिले. यावेळी मंत्री खवटे यांनी यंत्रणा व्यवस्थित करण्यासाठी निर्देश जारी करण्याचे आश्वासन दिले. कचरा समस्या मांडताना एका सरपंचाने मंत्र्यांना कचरा लघुप्रकल्प उभारण्याची सूचना केली. केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी पर्यटनाशी संबंधित प्रमुख कार्यक्रम करताना दक्षिण गोव्याचा विचार करावा, अशी साना केली. मडगाव पालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी भिकाऱयां मुद्दा उपस्थित केला. मडगाव पालिका उद्यानानजीक भिकाऱयां वावर वाढल्याने या उद्यानाची शोभा हरवली आहे. त्यामुळे भिकाऱयांना तेथे अन्न पुरवणाऱया स्वयंसेवी संस्थांना आवश्यक निर्देश देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांना द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली.









