रत्नागिरी :
दिव्यांगांसाठी आतापर्यंत २०० हून अधिक शासन निर्णय पारित करून घेतले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करण्याची गरज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संघटनांमध्ये विभागलेल्या दिव्यांगांनी एकत्र येऊन प्रहारच्या माध्यमातून संघर्ष करण्याचे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले. आगामी काळात दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
दिव्यांगांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने दिव्यांग जनता दरबार कार्यक्रम सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील अल्पबचत सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला संस्थापक
अध्यक्ष बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली.








