नवी दिल्ली
गांधी परिवाराचे जावई रॉबर्ट वड्रा लवकरच राजकारणात पाऊल ठेवणार आहेत. प्रियांका वड्रा यांच्या पतीने एक व्हिडिओ शेअर करत याचे संकेत दिले आहेत. मी लवकरच राजकारणात सामील होणार असल्याचे वड्रा यांनी याच्या कॅप्शनदाखल म्हटले आहे. प्रियांका वड्रा अलिकडेच केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात निवडून आल्या आहेत. रॉबर्ट वड्रा यांनी लोकसभा निवडणुकीवेळी अमेठी मतदारसंघाच्या उमेदवारीस इच्छुक असल्याचे वक्तव्य केले होते. परंतु काँग्रेसने तेव्हा त्यांना उमेदवारी दिली नव्हती.









