जिल्हा परिषदेच्या नाचणे गटात प्रचार सभा, काहींना पराभूत होण्याची सवय असल्याची बाळ मानेंना कोपरखळी
रत्नागिरी :
रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून मी सलग चारवेळा निवडून आलो आहे. मला सातत्याने निवडून येण्याची सवय आहे. ही मालिका मी यापुढेही कायम ठेवणार आहे. परंतु काहींना सतत पराभूत होण्याची सवय आहे, अशी कोपरखळी महायुतीचे रत्नागिरीतील उमेदवार उदय सामंत यांनी मारली.
नाचणे जिल्हा परिषद गटाच्या स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात आपल्याला सव्वा लाख मते मिळतील. मतदार यादीत माझे पहिल्या क्रमांकावर नाव आहे आणि पहिल्या क्रमांकावर राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दादा दळी, शिवसेनेचे बाबू म्हाप, जयसिंग घोसाळे, भैया भोंगले, प्रकाश रसाळ
आदी व्यासपीठावर उपस्थित होते.








