सांगली :
महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती कार्यक्रमात व्यस्त असतानाही राज्याचे पर्यटन, खनिज संपत्ती व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सांगली दौऱ्यावेळी पर्यटन मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पाटील यांच्या आई व त्यांच्या आजी श्रीमती प्रमिलादेवी पाटील यांची आस्थेने विचारपूस करून आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या. त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पाटील कुटुंबियांची त्यांनी आस्थेने विचारपूस करुन मनमोकळा संवाद साधला. यावेळी विरेंद्रसिंह पाटील, पुतणे ऋतुराज आणि स्नुषा प्रियांका, भाचा निखिल गवारे उपस्थित होते.
त्यानंतर पृथ्वीराजबाबा व त्यांच्या कार्यकत्यांनी त्यांचा सदिच्छा भेटीबद्दल सत्कार केला. यावेळी सांगलीचा पर्यटन विकास करण्यासाठी चांदोली राष्ट्रीय उद्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, सांगलीचा समृद्ध कृष्णा नदी काठ, दंडोबा परिसर या सर्व ठिकाणी काय काय करता येईल, याची चर्चा झाली व त्यादृष्टीने योजना करण्यात येतील असेही ना. शंभूराज देसाई म्हणाले.
यावेळी राज्याचे माजी मंत्री व सांगलीचे माजी पालकमंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे उपस्थित होते. आमचे भाचे ना. शंभूराज देसाई साहेब यांचे आमच्या कुटुंबाबर व सांगलीवर विशेष प्रेम व आपुलकीची भावना आहे. अत्यंत धावपळीच्या व्यस्त कार्यक्रमातून माझ्या निवासस्थानी भेट देऊन आईंचा आशीर्वाद घेतला.
कुटुंबातील सदस्य, हितचिंतक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत माझ्या कार्यकत्यांशी चर्चा करुन संवाद साधून मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यामुळे साहेबांची सदिच्छा भेट आमचे कुटुंबीय आणि माझे सहकारी कार्यकर्ते यांना सामाजिक कामासाठी अधिक उर्जा व प्रेरणा देणारी आहे.
यावेळी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम, सनी धोतरे, माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी, दिलीपभाऊ पाटील, इलाही बारूदवाले, अल्ताफभाई पेंढारी, रवींद्र वळवडे, विक्रम कदम, अॅड. अमोल चिमाण्णा, राजू देवर्षी, युबराज पाटील, अॅड. ए. ए. काझी, अशोकसिंग राजपूत, संतोष भोसले, रामभाऊ पाटील, अक्षय शेळके, विनायक शिंदे, महावीर पाटील, पैगंबर शेख, साजिद अत्तार, श्रीकांत साठे, दादा शिंदे, मारुती नवलाई, संजय काळोखे, प्रकाश पाटील, जयदीप पाटील, ओंकार शेरीकर, संजय सूर्यवंशी, शंकर माने, अजित पाटील, प्रशांत अहिवळे, राजेंद्र कांबळे, अल्ताफ मुल्ला व पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








