ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंद केल्यांनतर आणिक आमदार खासदार त्यांच्या सोबत गेले. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केले. त्यांनतर ज्येष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिक मनोहर जोशी (Manohar Joshi) देखील शिंदेंसोबत जाणार अशी चर्चा होती. पण मनोहर जोशी यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मनोहर जोशी यांनी शिवसेनेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आज मनोहर जोशी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हे ही वाचा : मुंबै बँक घोटाळा प्रकरण : प्रवीण दरेकरांना क्लीन चीट
माझं रक्त शिवसेनेचं आहे. आधी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, नंतर उद्धवजींचा सहवास, मी महाराष्ट्र, शिवसेनेसाठी आहे. शिवसेना ही संघटना महाराष्ट्रावर अतोनात प्रेम करते. बाळासाहेबांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो याचं समाधान आहे, असं मनोहर जोशी म्हणाले. मी उद्धव ठाकरेंसोबत सातत्याने उभा आहे. मी पहिल्यापासून आतापर्यंत शिवसेनेतच आहे, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.