सावंतवाडी : प्रतिनिधी
Will astrology be included in the new educational policy?
प्रा. प्रवीण बांदेकर यांचा सवाल
येत्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण लागू करणार असल्याचे शिक्षणमंत्र्यानी जाहीर केले आहे. ही गोष्ट स्वागतार्ह असली तरी बरीचशी घाईगडबडीची वाटते आहे, असे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यानी व्यक्त केले आहे.
शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी या दोन-तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे काय?आता आर्टस, काॅमर्स, सायन्सऐवजी आठवीपासूनच संबंधित शाखांचे विषय निवडून ते बारावीपर्यंत घ्यायचे आहेत. त्यादृष्टीने आवश्यक असलेली नवी पुस्तके छापून पूर्ण होणार आहेत का? दहावी बोर्डपरीक्षेऐवजी आठवी ते बारावी दर वर्षी दोन सेमिस्टरमध्ये परीक्षा होऊन ते मार्क्स बारावीच्या अंतिम परीक्षेतही मिळवले जाणार आहेत. या आठवी ते बारावी वर्गांना शिकवणारे शिक्षक कोण असणार आहेत? त्यांचे शैक्षणिक क्वालिफिकेशन काय असणार आहे? पगार स्केल इ. काय असणार आहे? नव्या पॅटर्नला अनुसरून त्यांचे प्रशिक्षण होणार आहे का? कधी होणार आहे? आठवी ते बारावीपर्यंतचे विषय पारंपरिकच असणार आहेत (उदा. विज्ञान, इतिहास, इ.) की त्यात कालनिहाय काही नवे विषय (उदा. फलज्योतिष, गोमूत्रचिकित्सा इ.) अंतर्भूत होणार आहेत, असे अनेक सवाल बांदेकर यानी उपस्थित केले आहेत.









