ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे माझ्या संपर्कात आहेत. कधीही काहीही होऊ शकतं, असं वक्तव्य शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांनी केलं आहे. शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर आता अंबादास दानवे शिंदे गटात प्रवेश करणार की काय, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
संभाजीनगरमध्ये आयोजित मेळव्यात शिरसाट बोलत होते. शिरसाट म्हणाले, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे माझ्या संपर्कात आहेत. त्यांचा मला फोन आला होता. दानवे यांनी त्यांच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत आपल्याकडे नाराजी व्यक्त केली. सुषमा अंधारे डोक्मयाच्या वर झाली आहे, असे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे केव्हाही काही होऊ शकतं. आमच्या मागे गर्दी नाही तर एवढे लोक कसे जमतात, याचा विचार करावा, असा टोलाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला.
अधिक वाचा : ‘Dis’Qualified MP’; राहुल गांधींनी बदलला ट्विटर बायो