तीन वर्षांमध्ये तिसऱ्यांदा विस्फोट
लँड ऑफ फायर अँड आइस या नावाने प्रसिद्ध आइसलँडमध्ये तीन वर्षांमध्ये दहाव्यांदा ग्रिंडाविक येथील ज्वालामुखीचा विस्फोट झाला आहे. पहिला विस्फोट 2021 मध्ये झाल होता, त्या पूर्वीच तेथील जमीन खचू लागली होती. भेगा पडल्या होत्या. आइसलँडच्या या भागात भूकंप होत होते, रस्ते खचून आतून तप्त अन् दुर्गंधयुक्त वायू बाहेर पडत होते. मग एक दिवस तप्त लाव्हारस बाहेर पडू लागला, शहरातील सर्व नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले, हे नागकि कधीच परतू शकले नाहीत, काही लोक आले, ते स्वत:च्या वस्तीची अवस्था पाहण्यासाठी. पूर्ण जग या ज्वालामुखीच्या विस्फोटाने हैराण आहे, तीन वर्षांपासून भूगर्भशास्त्रज्ञ या अचंबित करणाऱ्या विस्फोटाचे अध्ययन करत आहेत. कारण आइसलँड मिड अटलांटिक रिजवर असून तो उत्तर अमेरिकन आणि यूरेशियन टेक्टोनिक प्लेटदरम्यान स्थित आहे.
या दोन्ही टेक्टोनिक प्लेट्स दरवर्षी 2.5 सेंटीमीटरच्या वेगाने दूर जात आहेत. यामुळे त्यांच्यामधील अंतरातून पृथ्वीच्या दुसऱ्या थरामधून लाव्हारस येत आहे. हा लाव्हारस हे अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे पृथ्वीवर आइसलँडला ज्वालामुखी प्रकरणी सर्वाधिक सक्रीय मानले जाते. 800 वर्षांपर्यंत शांत राहिल्यावर पहिला छोटा विस्फोट 2019 मध्ये झाला होता. यानंतर तो शांत झाला होता, हळूहळू ग्रिंडाविकची भूमी हलू लागली, दरदिवशी भूकंपाचे झटके जाणवू लागले. कधी अधिक तीव्रतेचे तर कधी कमी तीव्रतेचे भूकंप जाणवत होते. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात तेथे विस्फोट झाला असता 24 तासांपूर्वी भूकंपाचे 800 धक्के जाणवले होते. लाव्हारस बाहेर पडून वाहताना दिसून येत होता. आइसलँडची राजधानी रेकजाविकपासून हा भाग केवळ 40 किलोमीटर अंतरावर आहे.
सातत्याने पिवळ्या आणि नारिंगी रंगाचा लाव्हारस बाहेर पडत आहे. तसेच सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या भेगांमधून सातत्याने 3530 ते 7060 क्यूबिक फूट लाव्हारस दर सेकंदाला बाहेर पडत असल्याचे आइसलँडच्या हवामान विभागाने सांगितले आहे. ग्रिंडाविकमध्ये प्रामुख्याने मच्छिमारांचे वास्तव्य आहे. ग्रिंडाविकच्या भूमीखाली 10 किलोमीटर अंतरावर लाव्हारस वाहत होता. या लाव्हारसाच्या प्रवाहामुळे निर्माण झालेल्या भूकंपांमुळे आइसलँडचे प्रमुख पर्यटनस्थळ ब्ल्यू लगून जियोथर्मल स्पा बंद करण्यात आला होता. हे सर्व विस्फोट फैगराडाल्सजाल ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्हारसामुळे होत आहेत. ज्वालामुखीच्या भुमीय भुयारं 6 किलोमीटर रुंद आणि 19 किलोमीटर लांब आहेत. वैज्ञानिक सातत्याने याचे अध्ययन करत आहेत. हे विस्फोट आणखी किती दिवस होत राहणार तसेच जमिनीखालून लाव्हारस बाहेर येत राहणार हे वैज्ञानिकांना आताच सांगणे शक्य नाही.









