ब्रिटनच्या रेस्टॉरंटकडून डेव्हिल्स ब्रेकफास्ट चॅलेंज
तुम्ही खादाड आहात का? तुमचे पोट कधीच भरत नसल्याचे वाटत असल्यास ब्रिटनमधील एका रेस्टॉरंटने दिलेले चॅलेंज तुमचे निश्चितच लक्ष वेधून घेईल. येथील रेस्टॉरंटने दिलेल्या चॅलेंजनुसार लोकांना स्पेशल 666 ब्रेकफास्ट संपवावा लागणार आहे. हा ब्रेकफास्ट अत्यंत मोठा असल्याने अनेक लोकांना हे चॅलेंज पूर्ण करता आलेले नाही.
666 चॅलेंजमध्ये प्रत्येक खाद्यपदार्थाचे 6 पीस खावे लागणार आहेत. आतापर्यंत या मॉन्स्टर चॅलेंजला कुणीच पूर्ण करू शकलेले नाही. ज्या लोकांनी हे चॅलेंज स्वीकारले त्यांना केवळ दोन टक्के लोकांनाच हे खाद्यपदार्थ खाता आले आहेत. यातील खाद्यपदार्थांची संख्या अधिक असल्याने मोठ्यातील मोठा खादाडही ते संपवू शकत नाही. याला डेव्हिल ब्रेकफास्ट नाव देण्यात आले आहे. हे चॅलेंज स्वीकारणाऱ्या लोकांनुसार ठराविक वेळेनंतर पोट फुटू लागेल असे वाटू लागते. कॉपर केटलच्या मालकांनुसार हा ब्रेकफास्ट संपविण्यासाठी पोटासोबत निश्चयी वृत्तीही असायला हवी.

या डेव्हिल ब्रेकफास्टमध्ये 6 सॉसेज, 6 बेकन, 6 फ्राइड एग, 6 हॅश ब्राउन, 6 ब्लॅक पुडिंग, 6 बेक्ड बीन्सचे बॉक्स, 6 टोमॅटो, 6 मोठे मशरूम सामील आहेत. याचबरोबर संबंधिताला 6 टोस्ट किंवा फ्राइड ब्रेड मिळतील. डेव्हिल ब्रेकफास्ट एक तासात संपविल्यास संबंधित व्यक्तीला कुठलेच बिल द्यावे लागणार नाही. तसेच त्याला एक टीशर्ट दिले जाणार आहे. रेस्टॉरंटने या चॅलेंजकरता 18 युरोचे शुल्क निर्धारित केले आहे.
आतापर्यंत सुमारे 100 लोकांनी हे चॅलेंज स्वीकारले आहे, यातील केवळ 2 जणांनाच ते पूर्ण करता आले आहे. त्यांनी 60 मिनिटात हा ब्रेकफास्ट संपविला असल्याची माहिती कॉपर केटलचे मालक टॉम अलुर्ड-रोवली यांनी दिली आहे.









