आ. वैभव नाईक यांची उपस्थिती.
३१ ऑगस्ट २०२३ रोजी माणगावात कृषी महाविद्यालय दापोलीच्या कृषी सह्याद्री गट व कृषी विभाग, माणगाव यांच्यामार्फत तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाक-कला स्पर्धेचे आयोजन केले गेले, सदरच्या कार्यक्रमात तब्बल 40 विविध रानभाज्या प्रदर्शित केल्या गेल्या.लोकांना विविध रानभाज्यांची ओळख व्हावी आणि त्यांचे औषधी गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचावे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट होते. या प्रदर्शनामध्ये पाक-कला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. ज्यामधे एकूण 51 महिलांनी भाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. सदरच्या कार्यक्रमास कुडाळ – मालवण मतदारसंघाचे आमदार.वैभव नाईक यांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली व आयोजकांचे विशेष आभार मानले .सदरच्या कार्यक्रमास एकूण 200 हून अधिक लोकांनी भेट देऊन रानभाज्यांची माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री.पी.पी.पाटील सर (उपविभागीय कृषी अधिकारी, सावंतवाडी) सौ.अश्विनी घाटकर (तालुका कृषी अधिकारी, कुडाळ)श्री.प्रवीण कोळी (कृषी अधिकारी, कडावल) ,अमोल करंदीकर (कृषी अधिकारी) श्रीम. गायत्री राऊत (कृषी अधिकारी, माणगाव) ,श्री. विनय घोंगे (कृषी अधिकारी, कुडाळ), सौ.भोसले मॅडम (सरपंच) ,डॉ.हेमंत बोराटे सर, डॉ.प्रविण झगडे ,डॉ.संदीप गुरव (केंद्रप्रमुख) आणि डॉ. रणजीत देवहरे (कार्यक्रमाधिकारी) , तसेच ग्रामपंचायत माणगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.









