दापोली :
रानकोंबड्याची शिकार केल्याप्रकरणी दापोली तालुक्यातील नितीन शांताराम झाडेकर (३४, कुंभवे) व आशिष अशोक पेडमकर (३२, वाकवली) या दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. हा प्रकार दापोली तालुक्यातील कुंभवे येथे सोमवारी उघडकीस आला.
१७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील मौजे कुंभवे येथील शिवप्रसाद चंद्रकांत शिंदे यांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूस रान कोंबड्याची शिकार झाल्याबाबत वनाधिकाऱ्यांना कळवले. वन अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली असता, शिंदे यांच्या घराच्या मागील बाजूस १०० मीटर अंतरावर असणाऱ्या रुपेश भिकू झाडेकर यांच्या घराकडे दोन व्यक्ती रानकोंबडा शिकार करून घेऊन गेल्याचे तक्रारदार शिंदे यांनी समक्ष दाखवले.








