हरिण, गव्यांचा उपद्रव : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, ठोस उपाययोजना करण्याची गरज
बेळगाव : मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे जनता भयभीत झाली आहे. येळ्ळूर येथे मंगळवारी गावात हरिण आढळून आल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी देसूर गावात गवीरेडे शिरल्याची घटना घडली आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनखात्याने योग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. वृक्षतोडीमुळे वनक्षेत्र कमी होत आहे. दरम्यान, वन्यप्राण्यांचा नैसर्गिक आधिवास नाहीसा होत आहे. त्यामुळे वन्यप्राणी अˆ आणि पाण्याच्या शोधात सैरभैर होऊ लागले आहेत. येळ्ळूरमध्ये हरिण व देसूर येथे गवीरेडे आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली आहे. वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. खानापूर तालुक्मयात घनदाट वन्यक्षेत्र आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्यादेखील टिकून आहे. देसूर आणि येळ्ळूर खानापूर तालुक्मयाला लागून आहे. त्यामुळे हरिण आणि गवीरेडे अˆाच्या शोधात आले असावेत. असा अंदाज वर्तविला जात आहे. येळ्ळूर येथे सापडलेले हरिण भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. तर देसूर येथील गवीरेडे नैसर्गिक अधिवासात निघून गेले आहेत. मात्र केवळ दोन दिवसात हे वन्यप्राणी आढळून आल्याने नागरिक मात्र धास्तावले आहेत.
उन्हाळ्याच्या झळा हळूहळू वाढू लागल्या आहेत. दरम्यान वनक्षेत्रात पाणी आणि चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे वन्यप्राणी शिवारात आणि मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. अलीकडच्या काही वर्षात बिबटे, गवीरेडे, रानडुक्कर, हरिण, सांबर, साळिंद्र, तरस आदींची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षभरात वन्यप्राण्यांनी मानवी वस्तीत धुमाकूळ घातला आहे. सप्टेंबरदरम्यान बेळगावात बिबट्यांनी तब्बल महिनाभर तळ ठोकला होता. दरम्यान शहरवासियांना बिबट्याच्या भीतीपोटी घरीच राहावे लागले होते. सांबरा, भुतरामहट्टी, कट्टणभावी, बेकिनकेरे आदि ठिकाणी तरस, गवीरेड्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे अलीकडे ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढताना दिसत आहे. वन्यप्राण्यामुळे शेतीपिकांचे नुकसान वाढले आहे. कट्टणभावी, बंबरगा, बेकिनकेरे, बसुर्ते, कुद्रेमनी, कोनेवाडी आदी गावात गव्यांच्या कळपाने पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. दरवषी पावसाळा कमी झाल्यानंतर वन्यप्राण्यांकडून नुकसान होऊ लागले आहे. विशेषत: रानडुक्कर, गवीरेडे आणि मोरापासून नुकसान होत आहे. मात्र वनखाते कोणतीच उपाययोजना राबविताना दिसत नाही.
ग्रामीण भागात वाढतोय वन्यप्राण्यांचा उपद्रव
ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. गवीरेडे, हरिण आणि इतर वन्य प्राणी देखील आता भर वस्तीत येऊ लागले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांची चिंतादेखील वाढू लागली आहे. डोंगर परिसरात अˆ आणि चाऱ्याची टंचाई होत असल्याने ही परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे डेंगर भागातच वन्यप्राण्यांना चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
देसूर गावात दोन गवीरेडे सुसाट
देसूर गावात बुधवारी दोन गवीरेडे सुसाट धावत सुटल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. काहींनी घाबरून दरवाजा आणि खिडक्मया बंद केल्या. सैरभैर झालेले हे गवे कळपातून बाहेर पडले असावेत, असा अंदाज वनखात्यांने वर्तविला आहे.
नागरिकांनी सावध राहणे गरजेचे
अलीकडे वन्यक्षेत्र वाढले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्यादेखील वाढली आहे. चारा आणि पाण्याच्या शोधात वन्यप्राणी सैरभैर होतात. हरिणापासून मानवाला कोणताही धोका नाही. शिवाय गवीरेडा हा लाजाळू प्राणी असल्याने तो पळून जातो. मात्र नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
– पुऊषोत्तम रावजी (आरएफओ, बेळगाव)









