जत :
रेवनाळ (ता. जत) येथे कौटुंबिक कारणातून पतीने पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून गंभीर जखमी केले होते, आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. रुक्मिणी विलास खांडेकर (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून मंगळवारी एक एप्रिल रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी पती विलास विठोबा खांडेकर (वय ४२) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून जत न्यायालयात हजर केले असता ७एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
रेवनाळ येथील विलास खांडेकर यांने दारू पिल्यानंतर पत्नी रुक्मिणी हिने तुम्ही दररोज दारू का पिऊन येता ? अशी विचारणा केली. संशयित विलास खांडेकर यांनी तुझ्या माहेरचे लोक माझ्या घरी का येतात, त्यांना घर नाही का, असे म्हणत शिवीगाळ केली.
यावेळी रुक्मिणीने माझ्या माहेरच्यांना का शिवीगाळ करता अशी विचारणा केली. यावरून दोघात बाद झाला होता. पती विलास याने आज तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली होती. दरम्यान मध्यरात्री रुक्मिणी झोपली असता विलासने डोक्यात दगडी वरवंटा टाकला. यात गंभीर जखमी झाली होती. मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती.
दरम्यान, रुक्मिणी यांचे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी भेट दिली आहे. रुक्मिणीच्या मृत्यूनंतर पती विलास याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.








