प्रतिनिधी / बेळगाव :
कौटुंबिक वादातून पतीने विळय़ाने हल्ला करुन पत्नीचा खून केल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील खोदानपूर येथे शुक्रवारी घडली आहे. पत्नीच्या खुनानंतर तो स्वतःहून पोलीस स्थानकात हजर झाला आहे. रुद्रव्वा चन्नबसाप्पा अडकी (वय 55) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. पती चन्नबसाप्पा अडकी (वय 62) याने खुनाची कबुली दिली असून दोडवाड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









