केडीपी बैठकीत पालकमंत्र्यांनी विविध समस्यांवर अधिकाऱयांना केल्या सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-सांबरा रस्त्याचे चार किंवा सहापदरीकरण करा, अशी सूचना पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱयांना दिली आहे. या रस्त्याच्या चार पदरीकरणासाठी 84 कोटी तर सहा पदरीकरणासाठी 112 कोटी रुपये खर्च येणार आहे. याचबरोबर जिल्हय़ातील आरोग्य, अंगणवाडी, शाळा, पिण्याचे पाणी यासंदर्भात पालकमंत्र्यांनी अधिकाऱयांना विविध सूचना केल्या आहेत.
सुवर्णसौध येथे केडीपी बैठक घेऊन अधिकाऱयांना माहिती दिली. नरेगा योजनेंतर्गत शाळांची संरक्षक भिंत, शाळांतील फरशी फिटींग याचबरोबर मैदान सपाटीकरण ही कामे करावीत, असे त्यांनी सांगितले. सध्या साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. त्यामुळे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हॉस्पिटलमध्ये औषधांचा साठा उपलब्ध करावा. याबाबत आवश्यकता भासल्यास वरि÷ अधिकाऱयांशी पाठपुरावा करा, असेही त्यांनी सांगितले.
बिम्स् देशामध्ये 12 व्या स्थानी आहे. ते एक उत्तम वैद्यकीय केंद्र असून त्याठिकाणी शिक्षणाबरोबरच रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करणे गरजेचे
आहे.
त्यासाठी अधिकाऱयांनी लक्ष देऊन प्रलंबित कामे पूर्णत्वाला न्यावीत, असे सांगितले. शेतकऱयांना खताचा तुटवडा भासत असेल तर तातडीने त्याबाबत माहिती द्यावी. जेणेकरून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून खताचा साठा उपलब्ध करणे शक्मय होईल.
कोणतीही प्रलंबित कामे ठेवू नका. सर्वसामान्य जनतेचे अर्ज तातडीने निकालात काढा, असेही त्यांनी सांगितले. संबंधित मतक्षेत्रांमध्ये आमदारांना भेटून ती कामे निकालात काढा. वसती योजना किंवा इतर कामे आमदारांशी बोलून निकालात काढावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
तालुका पातळीवर होणाऱया केडीपी बैठकीला सर्वच अधिकाऱयांनी उपस्थित रहावे. जेणेकरून असलेल्या समस्या दूर करता येतील. यावेळी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सध्या सर्दी, ताप, खोकला याचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने अधिक लक्ष देऊन साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवावे, असे सांगितले.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ग्रामीण मतदारसंघामध्ये शाळांच्या इमारती तसेच मध्यान्ह आहारासाठी असलेल्या स्वयंपाक खोल्यांची दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली. हिरेबागेवाडी गावच्या कचऱयाची समस्या गंभीर बनत चालली आहे. कचऱयासाठी दोन एकर जागा उपलब्ध करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनीही शिवारातील रस्ते तातडीने करण्याची मागणी केली आहे.
हलगा-बस्तवाड गावची पाणी समस्या सोडवा
सुवर्णसौधला लागूनच हलगा-बस्तवाड ही गावे आहेत. मात्र या दोन्ही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा तातडीने टेंडर काढावे, अशी मागणी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे.
लस उपलब्ध करा
सर्पदंश लस आणि कुत्र्याने चावा घेतल्यानंतर देण्यात येणारे इंजेक्शन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करावे. बऱयाचवेळा लस नसल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तेव्हा आरोग्य विभागाने त्याची काळजी घ्यावी, अशी सूचना अनेक आमदारांनी केली.
विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप
प्रतिभावंत विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करून लॅपटॉप तसेच शिष्यवृत्ती देण्यात आली.
या बैठकीला विधानसभेचे उपसभापती विश्वनाथ मामनी, आमदार महादेव यादवाड, आमदार दुर्योधन ऐहोळे, लखन जारकीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख संजीव पाटील यांच्यासह तहसीलदार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.