अर्चना बनगे, प्रतिनिधी
Makar Sankranti 2023 : महाराष्ट्रासह अन्य प्रदेशात मकर सक्रातीचा सण 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.मकर संक्रांतीपासूनच ऋतू बदलण्यास सुरुवात होते. भारतातील विविध प्रदेशात हा सण स्थानिक मान्यतेनुसार मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकर संक्रांतीला सूर्य दक्षिणायनपासून उत्तरायणच्या प्रवासाला सुरुवात करतो.या दिवशी दान आणि दक्षिणा याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने व्यक्तीला अनेक प्रकारचे लाभ मिळतात.पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाला भेटायला येतो. सूर्य-शनिशी संबंधित रंजक गोष्टीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
सूर्य-शनिशी संबंधित पौराणिक कथा
मकर संक्रांतीशी संबंधित शनिदेव आणि सूर्यदेव यांची पौराणिक कथा आहे. या कथेनुसार देवी पुराणात सांगितले आहे की, जेव्हा सूर्यदेव पहिल्यांदा आपला मुलगा शनिदेवाला भेटायला गेले तेव्हा शनिदेवाने त्यांना काळे तीळ अर्पण केले आणि त्याद्वारेच त्यांची पूजा केली.यावर सूर्यदेव खूप प्रसन्न झाले.सूर्याने शनीला आशीर्वाद दिला की जेव्हा तो मकर राशीत आपल्या घरी येईल तेव्हा त्याचे घर संपत्तीने भरून जाईल.तेव्हापासून मकर संक्रांत साजरी केली जाते.
मकर संक्रांतीला या गोष्टींचे महत्त्व आहे
-मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीपूर्वी काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये.
-मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी काळे तीळ दान केल्याने शनिदेवाची साडेसाती कमी होते असं म्हटलं जातं.
-मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा काळ्या तीळाने केली जाते.
-या दिवशी तुमच्या घरी कोणी भिकारी,साधू,वृद्ध किंवा असहाय व्यक्ती आल्यास त्याला कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका.
-मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी त्याला प्रसन्न करण्यासाठी सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप केला जातो.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









