सरकारी कारभाराबद्दल जनतेत संताप
पणजी : गोव्यातील बहुतेक रस्ते वेशेषत: पणजीतील रस्ते ख•sमय झालेले असताना दुसऱ्या बाजूला जुने गोवे ते रायबंदर या दरम्यानच्या एकही ख•ा नसलेल्या गुळगुळीत रस्त्यावर कोट्यावधी रुपये खर्चून हॉटमिक्सींगचे थर चढविण्यात येत आहेत. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून सरकारच्या या कारभाराबद्दल संतापही व्यक्त होत आहे. सरकारचे कोट्यावधी रुपये कसे पाण्यात जातात याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. जुने गोवे गांधी सर्कलपासून रायबंदरच्या रस्त्याला दुरुस्तीची देखील गरज नाही, कारण हा रस्ता गुळगुळीत आहे. या रस्त्याला कुठेही ख•s पडलेले नाहीत. असे असताना देखील यावर नव्याने हॉटमिक्सींगचे दोन थर चढविण्याचे काम गेले दोन दिवस चालू आहे.
हा निर्णय नेमका कोणाचा?
या रस्त्याचे विनाकारण नव्याने हॉटमिक्स डांबरीकरण करण्याची ही कल्पना नेमकी कोणाची? याबद्दलही मोठे प्रश्नचिन्ह आहे. एका बाजूला सरकारकडे आर्थिक टंचाई आहे, दुसऱ्या बाजूला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनेक कंत्राटदारांना त्यांची थकित बिले देण्यासाठी पैसे नाहीत. राज्यातील कित्येक असे रस्ते आहेत तिथे ख•s पडलेले असून त्याची दुरुस्ती करायला सरकारकडे निधी नाही, आणि जुने गोवेच्या या गुळगुळीत रस्त्यावर नव्याने हॉटमिक्सिंग करण्याचे हे नेमके डोके कोणाचे याचा काही हिशोब लागत नाही.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे मौन
दरम्यान साबांखामंत्री नीलेश काब्राल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे या अनावश्यक डांबरीकरणाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर नव्हते. आपण याची चौकशी करतो, एवढेचे ते उत्तरले. मात्र प्रत्यक्षात ही सरकारची नको तिथे होत असलेली उधळपट्टी थांबविण्याची गरज जनतेमध्ये व्यक्त होत आहे.









