तरुणभारत ऑनलाइन टीम
प्राचीन काळापासून तांब्याच्या भांड्यात खाणं -पिणं आरोग्यदायी मानलं जात.तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक आणि शुद्ध असतं. म्हणून आजही बयाच जणांच्या घरी हे पै पिलं जाते. पण याचे आरोग्याला नेमके फायदे काय होतात हे जाणून घेऊया.
१. आपल्या शरीरातील कॉपरची कमतरता असेल तर तांब्याचे पाणी पिल्यामुळे ती भरून निघते. त्याचबरोबर रोगास कारणीभूत असणाऱ्या बॅक्टेरियापासून आपले रक्षण होते.
२. सांधेदुखीच्या समस्येला तोंड देण्यासाठी ताब्यातील पाणी खूप फायदेशीर आहे.
३. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पूर्णपणे शुद्ध मानले जाते. हे सर्व प्रकारचे जीवाणू नष्ट करते, ज्यामुळे अतिसार, कावीळ, डिसेंट्री आणि इतर प्रकारचे रोग होतात.
४. तांबे कर्करोगाच्या प्रारंभापासून बचाव करण्यात मदत करते कारण त्यात कर्करोगविरोधी घटक असतात.
५. पोटातील समस्यांवर तांब्यातील पाणी उत्तम उपाय आहे यामुळे दररोज याचा उपयोग केल्याने पोटदुखी, गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता दूर होऊ शकते
६. तांब्यामध्ये मुबलक असलेले खनिज थायरॉईडची समस्या दूर करण्यात मदत करतात.
७. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्यामुळे त्वचेवरील फोड, पिंपल्स आणि त्वचेच्या इतर आजार वाढत नाहीत, यामुळे आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसते.
८. हृदय निरोगी ठेवून, रक्तदाब नियंत्रित करून खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. याशिवाय हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो.