वसई रोड पश्चिमेकडील सनसिटी भागात वसई विरार महापालिकेच्यावतीने सर्वधर्मीय दफनभूमी बांधण्यात येणार आहे. मात्र हिंदू वस्तीत मुस्लिम समाजासाठी दफनभूमी का? असा सवाल हिंदू संघटनेने वसई-विरार महापिलिकेला केला आहे. यासाठी आज हिंदू संघ़नेकडून जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात आज सकल हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.जनसमुदाय आक्रमक झाला आहे.याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.येथील वातावरण तापलं आहे.
हिंदू संघटनेने रस्त्यावर उतरून घोषणा देत आपली भूमिका मांडली. तर दफनभूमीची भिंत तोडण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









