आत्महत्येचा विचार आल्यास यंत्रणेकडून उपाययोजना ठरवल्या आहेत. मात्र आत्महत्येचा विचार येण्यामागील कारण व्यक्त करण्यास कित्येक वेळा यंत्रणाच अडथळा ठरते, असे डॉक्टर ‘ऑफ द रेकॉर्ड’ सांगतात. असे असल्यास कितीही समुपदेशनाचे, प्रतिबंधाचे कार्यक्रम-उपाययोजना राबवा, सुशिक्षित तऊण शिकाऊ डॉक्टर नैराश्येच्या गर्तेत गुंततानाच दिसेल. अशा प्रसंगातून प्राध्यापक-विद्यार्थी हे नातं अद्यापही 1947 च्या जुन्या काळात ऊतल्याचं सिद्ध होतंय. यातून शिकाऊ डॉक्टर मानसिक तणावातून आत्महत्या करणारच नाहीत याची खात्री मात्र कोणीच देताना दिसत नाही…
जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी केईएम रुग्णालयातील डॉ. आदिनाथ पाटील या तरुण निवासी डॉक्टरने स्वत:ला इन्सुलिनचे इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची घटना घडली. डॉ. आदिनाथबद्दल बोलताना अनेक सहकारी डॉक्टरांनी दु:ख व्यक्त केले. हुशार आणि हसतमुख असलेल्या डॉ. आदिनाथने आत्महत्या करणे हेच मुळात न पटणारे होते. सरळ सरळ आत्महत्या असूनदेखील सुरुवातीला निवासी डॉक्टरही व्यक्त होण्यास कचरत होते. आत्महत्येमागील कारण सर्वांसमोर स्पष्ट होते. मात्र कोणीच बोलताना दिसून येत नव्हते. कधी कधी त्या त्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाची कुप्रसिद्धी होऊ शकते म्हणून तर काहींना वरिष्ठांचा धाक वाटत असल्याने आत्महत्येचे कारण पुढे येत नसल्याचे काही निवासी डॉक्टरांनी संशय व्यक्त केला. या आत्महत्येतून दोन्ही बाजू प्रकर्षाने समोर आल्या. यात विद्यार्थी डॉक्टरांवर पडणारा कामाचा ताण, वेळ, अशा काही गोष्टी समोर आल्या. हे मुद्दे वरिष्ठ डॉक्टर कबुल करत असताना काहीजण विद्यार्थी नेमके डॉक्टरच व्हायला येतात का असा सवालही उपस्थित करतात. एखाद्या निवासी
डॉक्टरला 24 ते 48 तास वॉर्डात काम करावे लागते. त्यांच्या वेळा पत्रकानुसार निवासी
डॉक्टरांना सकाळी ओपीडी पहावी लागते. नंतर कॅज्युएलटी विभागात सेवा करावी लागते. ही कॅज्युएल्टी रात्रभर चालू असते. यातील काही रुग्ण दुसऱ्या दिवशी सकाळी दाखल कऊन घेण्याची प्रक्रिया सुरु होते. म्हणजेच निवासी
डॉक्टरांचे काम 24 ते पुढे 48 तासदेखील सुरु राहात असल्याचे निवासी डॉक्टर सांगतात. या दरम्यान येणारा कामाचा ताण काहींना सहन होत नाही. ज्यांना एखादे वर्ष प्रशिक्षणार्थी म्हणून झाले असल्यास असे डॉक्टर हा त्रास सहन कऊ शकतात. मात्र यातील काहींच्या भावनांचा कडेलोट होतो. हे थांबले पाहिजे अशी मागणी हे डॉक्टर करतात. काही माजी वरिष्ठ अधिष्ठाता निवासी डॉक्टरांवर येणारा कामाचा ताण कबुल कऊन निवासी डॉक्टरांची संख्या वाढल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सुचवतात. यातून ऊग्णालय परिसरात हॉस्टेल उभारणी, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सेवा यात सुधारणा आणण्याचा वेग वाढवण्याचे माजी अधिष्ठात्यांकडून सुचविण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी कामाचा ताण वाढण्यास सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टर संख्या कमी असल्याचे दाखवत आहे. म्हणजेच डॉक्टर संख्या वाढविण्याची सूचना होत आहे. डॉक्टर संख्या वाढल्यास बारा बारा तासांचे काम कऊन एखाद तास आराम तसेच अभ्यास करण्यास निवासी डॉक्टरला वेळ मिळू शकतो असे सुचविले जात आहे. सद्यस्थितीत डॉक्टर 48 तास काम कऊन त्याला झोप मिळाली नसल्यास त्या डॉक्टरच्या मानसिक तसेच शारिरीक स्थितीची दयनीय अवस्था होऊ शकते. अशावेळी त्या डॉक्टरकडून ऊग्णसेवेच्या दर्जाची अपेक्षा कसे बरे ठेऊ शकतो असा सवाल विद्यार्थी डॉक्टर उपस्थित करत आहेत. ऊग्णालयात निवासी डॉक्टरांना कामाचा ताण देणारे असे कित्येक विभाग आहेत. अशा विभागांमध्ये निवासी डॉक्टरांना गुलामांसारखी वागणूक दिली जात असल्याची तक्रार समोर येते. या विभागांमध्ये काम कऊन देखील विभाग प्रमुखांकडून बोलणी खावी लागतात. विद्यार्थी
डॉक्टर यालाच ‘टॉक्सिक कल्चर’ म्हणतात. असे ‘टॉक्सिक कल्चर’ असलेले विभाग अनेक असून या विभागांना विद्यार्थी डॉक्टर दबकून असतात. विद्यार्थ्यांमध्ये भीती असते. या भीतीची कारणे वेगवेगळी आहेत. यातील प्रमुख भीती म्हणजे तीन वर्षानंतर विभागप्रमुखांच्या हाती निवासी डॉक्टरांचे भविष्य असल्याने त्यांच्या विरोधात बोलण्यास विद्यार्थी धजावत नाहीत. डॉक्टर विद्यार्थी संघटनेत काम केल्यास त्या संघटनेच्या कामाप्रति विभागप्रमुख किंवा वरिष्ठ डॉक्टर नाराजी दर्शवतात. म्हणजेच मोकळे वातावरणच नसल्याचा आरोप होत आहे. समजून न घेणे, ओपीडी सुऊ असतानाच ऊग्णांसमोर अद्वातद्वा बोलणे, अपमान सहन करणे अशा बऱ्याच घटनांना निवासी
डॉक्टर तोंड देत असतात. ऊग्णासमोर गाढव कुत्रा किंवा डॉक्टरांची लायकी काढून बोलल्यास रुग्ण देखील निवासी डॉक्टरांना सन्मानपूर्व वागणूक देईल का अशासारख्या अनेक गोष्टींचा ताण सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या घटना विभाग प्रमुखांच्या कानावर घातल्यास ते त्याकडे कानाडोळा करतात. अशीच यंत्रणा वर्षानुवर्षे सुऊ आहे. मात्र हल्लीची पिढी लगेचच टोकाचा निर्णय घेत असल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढल्याची खंत मार्ड संघटनेचे आजी-माजी प्रतिनिधी व्यक्त करत आहेत. दरम्यान मध्यवर्ता मार्ड संघटनेकडून डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येतो. यातून डॉक्टरांना आधार दिला जात आहे. वैद्यकिय विद्यार्थ्यांना मानसिक समस्यांसाठी प्रशासनाकडून दोस्ती उपक्रम सुरु करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमधीलच समुपदेशक मैत्र निवडण्यात आले आहेत. नैराश्य चिंता काळजी वाटणाऱ्या लक्षणांची माहिती यावर मार्गदर्शन केले जाते. यातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल जाते. या दोस्ती उपक्रमातून आता पर्यंत 126 विद्यार्थ्यांनी मानसिक समस्या सांगितल्या. यातील 60 विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान समुपदेशक मात्र विद्यार्थी निवासी
डॉक्टर व्यक्त होत नसल्याचे सांगतात. तर काही वरिष्ठ प्राध्यापकांच्या मते काही विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी येतात का असा प्रश्न पडतो. विद्यार्थी डॉक्टरांना कुटुंबातून, शैक्षणिक, मानसिक अशा कोणत्याही स्तरावर काही अडचण असल्यास सांगा अशा सूचना कऊन देखील बहुतांश विद्यार्थी बोलतच नाहीत. एखाद्या आजारी विद्यार्थ्याचे राहिलेले काम किंवा अधीकचे काम करण्याची जबाबदारी पडल्यास काही विद्यार्थी पालकांना तक्रार करतात. अशावेळी पालकही ऊग्णालयात येऊन प्राध्यापकांना धमकावल्याच्याही घटना घडल्याचे वरिष्ठ प्राध्यापक सांगतात. तुम्हाला कोर्टात खेचू अशा धमक्यादेखील प्राध्यापकांना आल्याचे सांगण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षकांनाही पालकांची बोलणी खावी लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता मुलांशी कसे बोलायचे, किंवा त्यांना काय सांगावे काय सांगू नये आदी मुद्यांवर वरिष्ठ प्राध्यापक वर्ग ही भीती व्यक्त करताना दिसतात. या सर्व तक्रारी-प्रतितक्रारी ऊग्णालयांतील वातावरण विषद करत आहे. यावर सरकारने तसेच ऊग्णालय प्रशासनाने डॉक्टर संख्या वाढवणे, डॉक्टरांना सेवा सुविधा देत असताना वैद्यकीय महाविद्यालयात मोकळे वातावरण राहिल याची काळजी घेण्याची गरज आहे. तर वरिष्ठ प्राध्यापकांनी आता विद्यार्थी डॉक्टरस्नेही राहून प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. एखाद्या अव्यक्त भितीतून भविष्यातील तऊण डॉक्टरने नैराश्येतून आत्महत्या केल्यास वैद्यकीय क्षेत्राचेच नुकसान आहे.
राम खांदारे








