खुनाच्याच दिवशी सुकांत सावंत संपर्कात असल्याची चर्चा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणात वकिलाच्या नावाची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आह़े स्वप्नाली यांचा अतिशय थंड डोक्याने व निर्दयीपणे खून केल्यानंतर पती सुकांत सावंत हा रत्नागिरीतील कोणत्या वकिलाच्या संपर्कात होता, अत्यंत सफाईदारपणे केलेल्या या ‘कोल्ड ब्लडेड’ खुनात पडद्यामागे वकिलाची नेमकी काय भूमिका होती, या शक्यतांचीही खातरजमा आता पोलिसांकडून करण्यात येत आह़े
1 सप्टेंबर रोजी स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत व अन्य दोघांनी घराच्या किचनमध्ये गळा आवळून खून केल्याचे समोर आल़े या प्रकरणी पोलिसांनी पती सुकांत ऊर्फ भाई गजानन सावंत (47), रूपेश ऊर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (43) व प्रमोद ऊर्फ पम्या बाळू रावणंग (सर्व रा. सडामिऱया रत्नागिरी) यांना अटक केल़ी तीनही संशयित सध्या पोलीस कोठडीत असून पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आह़े
स्वप्नाली सावंत यांचा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट भाई सावंत व त्याच दोन्ही साथीदारांनी अत्यंत सफाईदारपणे केल़ी यामुळे तपास करणारे पोलीसही पुरते चक्रावून गेल़े भाई सावंत याने पोलिसांपुढे कबूल केल्याप्रमाणे स्वप्नाली यांचा मृतदेह घराच्या मागील बाजूला पेट्रोल टाकून जाळण्यात आल़ा तर यानंतर मृतदेहाची राख व हाडेही समुद्रात टाकण्यात आल़ी तसेच घराचा परिसरही स्वच्छ करण्यात आल़ा खुनाचा कोणताही सुगावा पोलिसांना लागू नये, यासाठी अत्यंत थंड डोक्याने पुरावे नष्ट करण्यात आल़े खून प्रकरणात पोलिसांनी भाई सावंत याचे कॉल डिटेल्स काढल़े खुनाच्याच दिवशी भाई सावंत हा रत्नागिरीमधील एका ज्येष्ठ वकिलाशी सातत्याने संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आह़े भाई सावंत याने या वकिलाशी कशासाठी संपर्क साधला होता, खुनामध्ये वकिलाची नेमकी काय भूमिका होती, या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत़ या वकिलालाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.
स्वप्नाली सावंत यांच्या खुनाचा तपास रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे हे करत आहेत़ सुकांत सावंत व अन्य दोन्ही आरोपी यांचे कॉल डिटेल्स पोलिसांकडून सातत्याने तपासून पाहिले जात आहेत़ यातून आणखी काही पुरावे हाती लागतात का, याची पडताळणी करण्यात येत आह़े तसेच पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली स्वप्नाली सावंत हिची राख फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आह़े तसेच स्वप्नाली यांच्या मुलीचा डीएनएही घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आह़े
डमी मृतदेह तयार करून जाळणार
स्वप्नाली सावंत हिचा खून नेमका कसा करण्यात आला, कशाप्रकारे मृतदेह जाळून त्याची राख समुद्रात टाकण्यात आली, या सर्व घटनाक्रमाचे सीन रिक्रिएशन पोलिसांकडून करण्यात येणार आहेत. त्यासाठी मृतदेहाची डमी पोलिसांकडून करण्यात येणार आह़े तीनही संशयितांना पुन्हा एकदा बंगल्यात नेऊन पोलीस घटनाक्रमाची पडताळणी करणार आहेत.









