मार्च महिन्यात 1.34 टक्क्यांपर्यंत घसरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मार्चमध्ये घाऊक महागाई दर (डब्ल्यूपीआय) 1.34 टक्क्यांवर आला आहे. ही गेल्या 29 महिन्यांतील निचांकी पातळी आहे. घाऊक महागाई दर फेब्रुवारी 2023 मध्ये 3.85 टक्के तर, जानेवारी 2023 मध्ये 4.73 टक्के होता. महागाईतील ही घसरण गहू, डाळी आणि इंधन यांसारख्या वस्तू स्वस्त झाल्यामुळे झाली आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये घाऊक महागाई 1.31 टक्क्के या निचतम पातळीवर होती. त्यानंतर सातत्याने महागाई दरात चढ उतार होत असतानाच आता मार्च महिन्यात 1.34 टक्क्यांवर आला आहे. घाऊक महागाई दरात घट झालेला हा सलग दहावा महिना आहे. किरकोळ महागाईची आकडेवारीही गेल्या सोमवारी जाहीर करण्यात आली. मार्च 2023 मध्ये ती 5.66 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती घसरल्याने किरकोळ महागाई कमी झाली. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (सीपीआय) बास्केटमध्ये खाद्यपदार्थांचा वाटा जवळपास निम्मा आहे.
खाद्यपदार्थ स्वस्त
मार्चमध्ये अन्नपदार्थ, कापड, खनिजे, रबर आणि प्लास्टिक उत्पादनांच्या किमतीत घट झाल्यामुळे महागाई दरात घसरण झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. याचदरम्यान कच्च्या पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, कागद आणि कागदाच्या उत्पादनांच्या किमतीही कमी झाल्या आहेत.
खाद्यपदार्थांची घाऊक महागाई फेब्रुवारीमध्ये 2.76 टक्के होती, ती मार्चमध्ये 2.32 टक्क्यांवर आली. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा मार्चमध्ये 3.28 टक्क्मयांवर असलेली महागाई दर आता 2.40 टक्क्मयांवर आला आहे इंधन आणि उर्जेची घाऊक महागाई फेब्रुवारीमधील 14.82 टक्क्यांवरून घसरून 8.96 टक्क्यांवर आली आहे.
मार्चमध्ये गव्हाचा घाऊक महागाई दर 9.16 टक्के होता, तर एका वर्षापूर्वी मार्च 2022 मध्ये तो 14.04 टक्के होता. डाळींची घाऊक महागाई 3.03 टक्के झाली आहे. दुधाची घाऊक महागाई गेल्यावषीच्या 4.12 टक्क्यांवरून यावषी मार्च 2023 मध्ये 8.48 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.









