दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत घट नोंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जुलैमध्ये घाऊक महागाई दर 2.04 टक्क्मयांवर आला आहे. जूनमध्ये हा दर 3.36 टक्क्यांपर्यंत वाढला होता. जूनमधील हा दर त्यापूर्वीच्या 16 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर होता. गेल्या महिन्यात दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा महागाई दर 8.80 टक्क्यांवरून 3.08 टक्क्यांपर्यंत घसरला. तर खाद्यपदार्थांची महागाई 8.68 टक्क्मयांवरून 3.55 टक्क्मयांवर घसरली. इंधन आणि उर्जेचा घाऊक महागाई दर 1.03 टक्क्यांवरून 1.72 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
14 ऑगस्ट रोजी जुलै महिन्यातील घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यापूर्वी 12 ऑगस्ट रोजी किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. जुलै महिन्यात किरकोळ महागाई 3.54 टक्क्मयांवर आली आहे. ही 59 महिन्यांची नीचांकी पातळी आहे. ऑगस्ट 2019 मध्ये महागाई 3.21 टक्के होती. खाद्यपदार्थांच्या किमती घसरल्याने महागाई कमी झाल्याचे सांगितले जात आहे.









