ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जागतिक आरोग्य संघटना भारतात पारंपरिक औषधांचे जागतिक केंद्र उभारणार आहे. संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी जामनगरमध्ये आयुर्वेद शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जयपूरच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केले. याचवेळी WHO ने भारतात जागतिक पारंपरिक औषध केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनीही जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषणेचे स्वागत केले.
भारतात कोरोना रोखण्यात पारंपरिक औषध पद्धतींचे मोठे योगदान आहे. आयुर्वेद ही भारताची परंपरा आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना भारतात जागतिक पारंपरिक औषध केंद्र उभारणार आहे, असे घेब्रेयेसस यांनी सांगितले.









