राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल
नोकरी बदलण्याचा ट्रेंड सध्या जगभरात सुरू आहे. काही लोक स्वत:च्या छोट्या कारकीर्दीत अनेक जॉब बदलत असतात. तर काही जण एकाचठिकाणी अनेक वर्षे काम करत असतात. आता नोकरी सोडण्यादरम्यान सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट असते राजीनामा पत्र. भविष्यात बॉससोबत तुमचे संबंध कसे राहतील हे या राजीनामा पत्रावर अवलंबून असते. संबंधित बॉस तुम्हाला पुन्हा नियुक्ती देणार की नाही हे देखील यावरच निर्भर असते. याचमुळे अनेक जण स्वत:च्या राजीनाम्याच्या पत्राकरता मोठी मेहनत घेत असतात. इंटरनेटरवर देखील राजीनामा लिहिण्याशी निगडित अनेक अनेक व्हिडिओ आहेत. परंतु एका इसमाने अत्यंत भयंकर क्रिएटिव्हिटीसोबत राजीनामा पत्र लिहिले असून ते आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहे.
‘स्विगि इन्स्टामार्ट’च्या ट्विटर हँडलवरून एक छायाचित्र पोस्ट करण्यात आले आहे. याच्या कॅप्शनमध्ये ‘इन्स्टामार्टचा वापर करत स्वत:शी नोकरी कशी सोडावी’ असे नमूद करण्यात आले आहे. या ट्विटला आतापर्यंत 91 हजारांहून अधिक ह्यूज आणि दोन हजारांहून अधिक लाइक्स प्राप्त झाल्या आहेत. प्रत्यक्षात राजीनाम्याचे हे पत्र अत्यंत अनोखे आहे. कारण यात काही शब्दांच्याजागी खाण्यापिण्याच्या प्रसिद्ध गोष्टींचे रॅपर वापरण्यात आले आहेत. लिटिल हार्ड लिहिण्याऐवजी ‘लिटिल हार्ट’ पॅकेजचा वापर करण्यात आला आहे.









