वेद याचा अर्थ आहे ज्ञान. सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच ज्ञान अस्तित्वात आहे, पण ह्याची ज्यांना कल्पना नाही त्यांनी अनेक तर्क करून शोधण्याचा प्रयत्न केला पण निश्चित असे उत्तर प्राप्त होत नाही. ज्यांना वेदाबद्दल कल्पना आहे तेही गोंधळून गेले आहेत की वेद कोणी व कशासाठी सांगितले. काही जण म्हणतात की वेद हे अनेक ऋषीमुनींच्या साक्षात्कारातून, अनुभवातून साकार झाले आहेत. कोणी एक त्याचा उत्पत्तीकर्ता नाही म्हणून वेदांना अपौरुषेय असेही म्हणतात. वैदिक संस्कृतीचा अभिमान असणारेही सांगू शकत नाहीत की वेद कोणी व कशासाठी सांगितले. स्वतःच्या तर्काने ह्याचे उत्तर समजण्याऐवजी आपण जास्त गोंधळात पडण्याची शक्मयता अधिक आहे. ह्यासाठी वेद कोणी व कशासाठी सांगितले हे गीता भागवतसारख्या प्रामाणिक शास्त्राधारे आणि त्याचे तंतोतंत पालन करणारे आचार्य ह्यांच्याकडून या प्रश्नाचे उत्तर आपण प्राप्त केले पाहिजे.
आचार्य संत तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाची शोधिला ।।1।। विठोबासी शरण जावे । निजनि÷ा नाम गावें ।।2।। सकळ शास्त्रांचा विचार । अंती इतुकाची निर्धार ।।3।। अठरा पुराणी सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ।।4।। अर्थात ‘वेदांमध्ये अनेक विषयाबद्दल भगवान अनंतानी (श्रीकृष्णांनी ) वर्णन केले आहे. त्या सर्वांचे सार (निष्कर्ष) एकच आहे, ते म्हणजे विठोबाला शरण जाऊन नि÷sने त्यांच्या पवित्र नामांचा जप करावा. सर्व शास्त्रांचा विचार करून निर्धाराने हेच सांगितले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अठरा पुराणांनीही शेवटी हाच एक सिद्धांत सांगितला आहे.’ सामान्यतः लोकांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद, उपनिषदे, 18 पुराणे, महाभारत, रामायण याबद्दल माहिती असते. पण दुर्दैवाने या सर्व वैदिक साहित्याचा उद्देश काय आहे हे माहीत नाही. या ग्रंथांमध्ये देश-काळ-पात्र यानुसार अनेक संदर्भ देऊन आपण ज्या ब्रह्मांडामध्ये राहतो त्याचा इतिहास सांगितला आहे. कलियुगातील कमी बुद्धीच्या, स्वतःच्या शरीरापलीकडे विचार न करणाऱया लोकांना सर्वच काही समजेल असे नाही कारण हे सर्व ग्रंथ जो शरीरभावनेतून मुक्त आहे आणि जो मुक्त होऊ इच्छितो त्यांच्यासाठी आहेत. यासाठी या अभंगात वर्णन येते की सर्व वेद, शास्त्रे, पुराणे यांचा निष्कर्ष हा आहे की, भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन निजनि÷sने त्यांच्या पवित्र नामाचा जप करावा. अनेक लोकांची मत मतांतरे तर्क, चर्चा, खंडन-मंडन इत्यादी उपायांनी मनुष्य जन्मातील वेळ वाया जाईल आणि त्यातून काही निष्पन्न होणार नाही. वेद स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहेत आणि त्यामागचा उद्देशही त्यांनीच सांगितला आहे. सर्व आचार्यांनी याचा स्वीकार केला आहे तर तर्कवितर्क करण्यात वेळ दवडण्यात काय अर्थ आहे?
भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात (भगी 15.15) सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् । अर्थात ‘मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.’ वेद-शास्त्र, पुराणांमध्ये देश, काल, परिस्थितीनुसार अनेक विषयांची चर्चा केली आहे. जर श्रीकृष्णाचा परमभक्त असणाऱया प्रामाणिक गुरुंच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्माचा अभ्यास केला नाही, तर ‘विठोबासी शरण जावे’ या निष्कर्षापर्यंत न पोहोचता आपण इतर विषयांमध्ये गुंतून जाऊ. यास्तव भगवान श्रीकृष्ण आपल्याला सावध करतात (भगी 2.42-43) यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः । वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्। क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति । अर्थात ‘अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गाप्रत उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रियतृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही.’
या जगामध्ये अगदी नास्तिक लोकांपासून ते भगवंताच्या शुद्ध भक्तापर्यंत सर्वांसाठी भगवान श्रीकृष्ण वेदांच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. त्यासाठी भगवंतांनी श्रीव्यासदेवांच्या रूपाने अवतार धारण केला आणि सर्व वैदिक साहित्याचे संकलन केले. सर्वच लोक एक भावनेमध्ये नसतात, एकाच विचाराचे नसतात त्यामुळे वेदांमध्ये अनेक लोकांना अनेक प्रकारे मार्गदर्शन केले आहे. पण सर्व भोग भोगल्यानंतर जीवात्मा जेव्हा आपल्या मूळ स्थितीची जाणीव करून घेतो आणि त्याला कळते की आपण या जगामध्ये दुःख भोगत आहोत. अशा जीवात्म्यांना भगवंत आपल्या दुःखाचे कारण समजावून देताना सांगतात (भगी (15.7) ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनःष÷ानीन्दियाणि प्रकृतिस्थानि कर्षति । अर्थात ‘बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. ‘प्रत्येक देहांमध्ये भगवंताचा अंश उपस्थित आहे. जेव्हा हा अंश शारीरिक बंधनातून मुक्त होतो तेव्हा तो आध्यात्मिक विश्वातील एखाद्या वैकुंठ लोकांमध्ये आपले मूळ आध्यात्मिक शरीर
प्राप्त करतो आणि भगवंताच्या सानिध्यात राहतो. सर्व जीवात्मे भगवंताचे अंश आहोत, हे विसरून आपण या जगात अनेक प्रकारचे दुःख, वेदना भोगत आहोत. यातून जर कायमची सुटका करून घ्यावयाची असेल तर त्यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे ‘विठोबासी शरण जावे’. या अभंगातून जगद्गुरु या नात्याने तुकोबा भगवान श्रीकृष्णांनी सर्व जीवांच्या उद्धारासाठी भगवद्गीतेत सांगितलेल्या खालील आदेशांची आठवण करून देत आहेत. (भ गी 18.65 आणि 66) मन्मना भव मद्भ?क्तो मद्याजी मां नमस्कुरु । मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियो।़सि मे । अर्थात ‘आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील’ सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा श®ाः अर्थात ‘सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस’. तुकाराम महाराजही प्रामाणिकपणे ह्या संदेशाचा आपल्या अभंगातून सातत्याने उपदेश करतात. म्हणून वेदांचा खरा अर्थ केवळ त्यांच्यासारख्या हरिभक्तांकडूनच आपल्याला समजून घेतला पाहिजे. दुर्दैवाने जे हरिभक्त नाहीत अशा तथाकथित विद्वानांकडून आपण जर वेद समजून घेण्याचा प्रयत्न केला तर वेद समजण्याऐवजी आपल्या मनात गोंधळ निर्माण होईल आणि आपला वेदांवरील विश्वास नाहीसा होईल आणि आपण सहजपणे नास्तिकपणाकडे ओढले जाऊ. यासाठी संत तुकाराम आपल्याला सावध करतात.
वेदांचा तो अर्थ आम्हांसींच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।। 1 ।। खादल्याची गोडी देखिल्यासी नाही । भार धन वाही मजुरीचे ।।2।। उत्पत्ती पाळण संहाराचे निज । जेणे नेले बीज त्याचे हाती ।।3।। तुकां म्हणे आम्हा सांपडले मूळ । आपणचि फळ आले हाता ।। 4।। अर्थात ‘वेदांचा अर्थ आम्हा हरिभक्तांनाच कळतो, इतर केवळ वेदपंडित म्हणून निरर्थक ज्ञानीपणाचे ओझे वाहत असतात. जो अन्न खातो त्यालाच त्या पदार्थाची चव कळते, ती चव नुसते अन्न पाहणाऱयांना कळत नाही. धन वाहणाऱया मजुराला ते धन प्राप्त होत नाही. सृष्टीची उत्पत्ती, पालन व संहार करणाऱया श्रीहरिंनी ते ज्ञानाचे बीज आपल्या हाती राखून ठेवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात जो त्या हरिला आपलासा करतो त्यालाच वेदांचा अर्थ कळतो. आम्हाला वेदांचे मूळ भगवान श्रीकृष्ण हाती आले म्हणून त्यांच्या भक्तीचे फळ आपोआपच प्राप्त झाले आहे.’ सारांशाने सांगावयाचे झाल्यास वेद भगवान श्रीकृष्णांनीच सांगितले आणि त्यांचा उद्देश आहे आपले त्यांच्याशी असलेले सनातन नाते समजून घेणे. त्यासाठी भगवंतांना शरण जाणे आणि नि÷ापूर्वक हरिनामाचा जप करणे हाच वेदांचा निष्कर्ष आहे.
-वृंदावनदास








