मुंबई प्रतिनिधी
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी वारंवार देणारा प्रदीप भालेकर याच्यावर मलबार पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व त्याला पोलिसांनी अटकही केली आहे . भालेकर हे गेली एक वर्षाहून अधिक काळ फोनवरून श्री केसरकर यांना व त्यांच्या सावंतवाडीतील संपर्क कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना श्री केसरकर यांना आपण जीवे मारणार अशी धमकी देत होता व तसेच खंडणीची मागणी करत होता. याकडे मंत्री केसरकर यांनी दुर्लक्षही केले होते. तसेच श्री केसरकर यांची गेल्या काही वर्षांपूर्वी भालेकर यांच्याशी ओळख झाली होती. भालेकर यांना श्री केसरकर याने अनेक वेळा आर्थिक मदतही केली आहे. याचा फायदा घेऊन भालेकर यांनी श्री केसरकर यांना धमकावण्याचा प्रयत्न केला . या पार्श्वभूमीवर भालेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना अशी धमकी देण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. यापूर्वी राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनाही अशा स्वरूपाची धमकी देण्यात आली होती.
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg