सातारा :
साताऱ्यात अनेक समस्या आहेत. समस्या सोडविण्यासाठी सातारा पालिकेचा प्रयत्न सुरु असतो. मात्र, पालिकेच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांचीही साथ महत्वाची असते. शहरातले फुटपाथ हे आमच्याच मालकीचे आहे. या आर्विभावात काहींनी फुटपाथवर व्यवसाय थाटून तर काहींनी आपली वाहने पार्क करुन फुटपाथ हायजॅक केला आहे. दरम्यान, शहरात मोकाट जनावरांबाबत पालिकेने नोटीस बजावून आठ दिवस झाले असतील तरीही मोकाट जनावरे दररोज शहरात कुठे ना कुठे रस्ता रोको करताना दिसतात. त्याचबरोबर गटर तुंबण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्याचबरोबर गटरचे चेंबरच्या शेजारीही खड्डे पडून ररता खचण्याची भीती व्यक्त होत आहे.

सातारा शहरात फुटपाथ हा चालण्यासाठी नाही तर किरकोळ विक्रेत्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे, अशी बाब अनेक ठिकाणी निदर्शनास येत आहे. त्यामध्ये सातारा हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालय असेल किंवा देवी चौक ते मोती चौक या रस्त्यावर पहायला मिळत आहे. काही ठिकाणचे तर भाडे पावती पालिकेकडे जमा सुद्धा होत नाही. काही स्थानिक नेते मंडळीच त्या किरकोळ विक्रेत्यांच्या हत्यावर मोठे होताना दिसतात. पालिकेकडून कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर अटकाव केला जातो. तसेच काही व्यापारी आपली वाहने फुटपाथवर लावतात. असे चित्र सातारकरांना दिसते.
दरम्यान, सातारा शहरात मोकाट जनावरे रस्त्यावर सोडू नका अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पालिकेच्यावतीने देण्यात आला आहे तरीही शहरात दररोज सकाळी मोकळी जनावरे सोडून देवून ती जनावरे सायंकाळी नेण्याचा उपक्रम काही पशुपालक करतात. त्यामुळे रस्त्यात कधीही अचानकपणे मोकाट जनावरांचा रस्ता रोको होतो. वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर साताऱ्यात काही दिवसांपूर्वीच गोलबागेच्या समोर तुंबत असलेले गटरचे काम करण्यात आले होते. तरीही पुन्हा तेथेच गटर तुंबून ते रस्त्यावरुन रविवारी दिवसभर वाहत होते. त्यामुळे तेथील स्थानिक व्यावसयिकांनाच दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. तसेच राजवाडा एसटी स्टॅण्डच्या समोरच कोपऱ्यात मंगळवार तळयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक चेबर आहे. त्या चेंबरला लागूनच खड्डा मोठा पडण्याची शक्ता आहे. त्यावर एखादे मोठे वाहन गेले की हा खड्डा पडून ररत्यात अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








