कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ विधानसभा मतदार संघासाठी वैभव जयराम नाईक , रा -चैतन्य नगर, पवई यांच्या नावे अपक्ष म्हणून सागर सोलकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. हे नाईक आज उमेदवारी अर्ज दाखल करतात का याकडे लक्ष लागून राहीले आहे. हे नवीन वैभव नाईक कोणाचे कार्यकर्ते आहेत. याबाबत तहसिलदार कार्यालय परिसरात चर्चा सुरू झाली आहे.गुरुवारी उबाठाचे विद्यमान आमदार वैभव विजय नाईक रा- कणकवली यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अशातच नवीन वैभव नाईकांनी अर्ज खरेदी केल्याने उत्सुकता वाढली आहे.लोकसभेला उबाठाचे विनायक भाऊ राऊत यांच्या नावाला सुसंगत अशा आणखी एका विनायक लऊ राऊत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता .त्यांना 15,826 मते मिळाली 1. 73 टक्के मते मिळाली ते तिसऱ्या क्रमांकावर राहीले होते.









