Rakhi Savant And Adil Durrani : राखी सावंत तिच्या बोल्ड स्टाइल आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे मीडियाच्या नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून राखीच्या लग्नाबाबत बरेच नाट्य रंगले. राखीने अलीकडेच तिचा प्रियकर आदिल दुर्रानी सोबतच्या लग्नाची बातमी उघड केली होती. यानंतर आदिलने या लग्नाबाबत मौन बाळगले. यानंतर पुन्हा आदिलने त्याच्या इंन्टाग्रामवर लग्नाची कबुली दिली आहे. 44 वर्षीय राखी सावंत सोबत लग्न करणारा आदिल दुर्रानी नेमका आहे तरी कोण हे जाणून घेऊया.














