बिहारमधील लोक भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांना ओळखत नाहीत. असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejswi Yadav) यांनी सांगितले. राज्यातील भारतीय जनता पक्षापासून फारकत घेतल्यानंतर भाजपचे अध्यक्षांनी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर हल्लाबोल केला.
मुझफ्फरपूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना नड्डा यांनी भाजपशी संबंध तोडून राष्ट्रीय जनता दल (RJD) सोबत महागठबंधन स्थापन केल्याबद्दल बिहारच्या मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली होती. ते म्हणाले की “नितीश कुमार यांना राज्यातील लोकांची पर्वा नाही ते भूमिका घेऊ शकत नाहीत”. पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी बिहारच्या लोकांचा अनादर केला. राज्यात अजूनही जंगलराज आहे. ‘राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही. भाजपने बिहारचे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे,” असेही ते म्हणाले.
नड्डा यांच्या टीकेला तेजश्वी यादव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जेपी नड्डा यांच्यावर टोकदार हल्ला करताना म्हटले आहे की, “बिहारमधील लोकांनी भाजपला यापूर्वीच नाकारले आहे. भारतीय जनता पक्षाने तथ्यात्मक बोलणे आवश्यक आहे. जेपी नड्डा यांनी बिहारमध्ये कोणीही ओळखत नाही. ” असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









