कोरोनावरील उपचारात होणार मदत ः हेटेरोकडून निरमाकॉनची निर्मिती
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी हेटेरोकडून कोरोनावरील उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) मंजुरी मिळाली आहे. हेटेरोचे कोविड-19 ओरल अँटीव्हायरल ट्रीटमेंट निर्मत्रेलवीरचे जेनेरिक व्हर्जन आले आहे. हे औषध लोकांना केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मिळणार आहे. हेटेरोने ओरल औषध ‘निरमाकॉम’च्या स्वरुपात एक कॉम्बो पॅक सादर केला आहे.
हेटेरोचे ‘निरमाकॉन’ हे फायजरची कोरोनावरील ओरल अँटीव्हायरल औषध ‘पॅक्स्लोविड’चे जेनेरिक व्हर्जन आहे. उच्चा जोखीमयुक्त रुग्णांसाठी हा एक चांगला वैद्यकीय पर्याय आहे. परंतु रुग्णांना हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे असे जागतिक आरोग्य संघटनेकडून म्हटले गेले आहे.
कोविड-19 ओरल अँटीव्हायरल ट्रीटमेंट निर्मत्रेलवीरचे जेनरिक व्हर्जन ‘निरमाकॉन’साठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळाली आहे. हे औषध कोरोना संक्रमणाविरोधात उपयुक्त ठरणार आहे. आमच्या औषधाला डब्ल्यूएचओकडून मंजुरी मिळणे कोरोनाविरोधी लढाईत एक मैलाचा दगड आहे, कारण हे आम्ही गरजू लोकांपर्यंत या इनोव्हेटिव्ह अँटीरेट्रोव्हायरल औषधाला पोहोचविता येणार असल्याचे उद्गार हेटेरो ग्रूप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. वामसी कृष्णा बंदी यांनी काढले आहेत.
रुग्णालयात दाखल उच्च जोखीमयुक्त रुग्णांसोबत मध्यम तसेच कमी जोखीम असलेल्या कोरोनाबाधितांना निर्मत्रेलवीर अन् रिटोनावीर औषध देण्याची शिफारस डब्ल्यूएचओने केली आहे. निरमाकॉन हे औषध कमी किमतीत जलदपणे उपलब्ध करविण्यासाठी प्रतिबद्ध आहोत, असे डॉ. वामसी यांनी म्हटले आहे.









