गोवा पर्यटन विकास महामंडळाचा म्हादई नदीवर उपक्रम
उदय सावंत/उस्ते
पावसाच्या धो-धो कोसळणाऱ्या सरी व नदीच्या दुतर्फा भागांमध्ये असलेले निसर्ग सौंदर्य व म्हादई नदीचा खळखळणारा प्रवाहात यंदाच्या पावसाळी मोसमातील व्हाईट वॉटर राफ्टिंगचा थरार आज दि. 9 जुलैपासून सुरू झाला. धार्मिक पूजन करून गणपती पूजन करण्यात आले नंतर सार्वजनिक सांगणे करून यंदाच्या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. नगरगाव सरपंच संध्या खाडीलकर, उपसरपंच रामा खरवत, पंचायत सदस्य राजेंद्र अभ्यंकर व स्थानिक पत्रकारांच्या उपस्थितीत व्हाईट वॉटर राफ्टिंगचा प्रारंभ करण्यात आला. गोवा पर्यटन विकास महामंडळ यांच्यावतीने व्हाईट वॉटर राफ्टींगमध्य़े उस्ते भागातून सावर्डे पर्यंतचे अंतर अनुभवण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होत आहे.
उस्ते ते सावर्डे तार दरम्यानचे अंतर 10 किलोमीटरचे अंतर म्हादई नदीच्या प्रवाहातून व्हाईट वॉटर मधून कापण्यात येते. यासाठी जवळपास दीड तास वेळ लागतो. म्हादई नदीचा खळखळणारा प्रवाह व दुतर्फा असलेला निसर्गसम्य परिसर हा साहसी पर्यटकांना एक वेगळाच आनंद देत असतो. व्हाईट वॉटर राफ्टींगची सुरूवात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या संकल्पनेतून झाली होती. दरवर्षी पावसाळी हंगामात जवळपास तीन तास व्हाईट वॉटर राफ्टींग करण्यात येते. गोवा पर्यटन विकास महामंडळातफ्s&ढ ऑनलाईन बुकिंग होते. प्रत्येकी 1600 ऊपये आकारले जातात. आतापर्यंत हजारो जणांनी व्हाईट वॉटर राफ्टींगचा आनंदाचा अनुभवला आहे.
उपक्रमातून पंचायतीला महसूल
व्हाईट वॉटर राफ्टींग होणारा नदीचा परिसर हा नगरगाव पंचायत क्षेत्रात आहे. या उपक्रमातून पंचायतीला दरवर्षी चांगला महसूल प्राप्त होतो. व्हाईट वॉटर राफ्टींगसाठी पर्यटक येतअसलयामुळे स्वयंरोजगाराला चांगली संधी प्राप्त होते. टुरिस्ट हॉटेल्सनाही चांगला धंदा होतो. या उपक्रमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होत आहे. या उपक्रमातून गावाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे सरपंच संध्या खाडिलकर यांनी सांगितले.
उस्तेतील व्हाईट वॉटर राफ्टींगचा अनुभव वेगळाच
देशात अनेक ठिकाणी वॉटर राफ्टिंग आहे. मात्र सत्तरीतील उस्ते येथील व्हाईट वॉटर राफ्टींगचा अनुभव अत्यंत सुखद असा वेगळाच आहे. दरवर्षी पर्यटक खास करून या ठिकाणी येत असतात. यामुळे देशातून याला चांगला प्रतिसाद मिळतो, असे व्हाईट वॉटर राफ्टिंगंचे तज्ञ नौशाद यांनी सांगितले.
पंच, पत्रकारांनी घेतला अनुभव
यंदाच्या मोसमाला प्रारंभ केल्यावर सरपंच संध्या खाडीलकर, पंचायत सदस्य राजेंद्र अभ्यंकर, रामा खरवत, पत्रकार उदय सावंत, कल्पेश गावस, देविदास गावकर यांनी व्हाईट वॉटर राफ्टींगचा अनुभव घेतला. अनेक ठिकाणच्या अडचणीवर मात करून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला. राफ्टिंग म्हणजे नक्की काय असते याचा प्रत्यक्षपणे अनुभव घेण्याची संधी प्राप्त झाली. सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. देशामध्ये अनेक ठिकाणी व्हाईट वॉटर राफ्टींग आहे. मात्र सत्तरतील व्हाईट वॉटर याला विशेष महत्त्व असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास व्हाईट वॉटर करण्यास अधिक मजा येत असते असे त्यांनी सांगितले.









