रत्नानिरी :
रत्नागिरीतील पांढरा समुद्र आणि भाट्ये समुद्र किनाऱ्यावर गेल्या ४० वर्षांमध्ये प्रथमच ‘चायना शिंपल्यां’चा मोठा समुद्री खजिना सापडला आहे. हा खजिना लुटण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उड़ाली आहे. नागरिक मिळेल ते साहित्य घेऊन या किनाऱ्यांवर धाव घेत आहेत. गेल्या आठवडाभरापासून हे शिंपले मिळू लागल्याने रत्नागिरीतील खवय्यांची चंगळ झाली आहे.
रत्नागिरीच्या या किनाऱ्यांवर पावसाने उसंत घेताच येथील मच्छीमारांना वा शिंपल्यांचे घबाड सापडले. मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर शिंपले मिळत असल्याने या किनाऱ्यांवरील स्थानिकांसह अगदी ग्रामीण भागातील नागरिकांनीही किना-यावर शिपले (मुळे) गोळा करण्यासाठी समुद्रकिनारी धाव घेतली आहे, त्यात बघ्यांची गर्दी पांढरा समुद्र असो वा भाट्ये पुलाच्या ठिकाणी वाढली आहे. भाट्ये पुलावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहून शेवटी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आल्याची वेळही आली.

कोकणात प्रामुख्याने तिसरे व धामणे अशा दोन शिंपल्यांच्या जाती मोठ्या प्रमाणावर आढळतात, मत्स्यप्रेमी खवय्ये तिसरे मुळ्यांना मोठी पंसती व ते मोठ्या आवडीने खाल्ले जातात. मात्र, सध्या पांढरा समुद्र व भाट्ये किनाऱ्यावर सापडत असलेली मुख्यांची जात चोटी येगळी आहे. पाला ‘चायना मुळा असे स्थानिक नाव देण्यात आले आहे. पण ते तिसरे किया चामणे मुळ्याच्या कुळातीलच असल्याचे सागरी जीव तज्यांकडून सांगण्यात आले. या शिंपल्यांचे घबाड भाट्ये, पांढरा समुद्र किनाऱ्यावर सापडल्याने रत्नागिरी शहराखत तालुक्याच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ हे मुळे गोळा करण्यासाठी गर्दी करत आहेत, दरदिवशी शेकडोंच्या संख्येने है शिंपले गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे हे दोन्ही किनारे ग्रामस्थांनी फुलून गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे. एक-एक जण मोठमोठ्या पोतात्या भरून हा समुद्री खजिना घेऊन जात आहेत. त्यासाठी पागली, जाळ्या असे साहित्य घेऊन ज्यांनी कधी मासेही पकडलेले नाहीत, असेही नागरिक गर्दी करूल है शिंपले पकडण्यानी मजा लुटत आहेत.
- चायनिज नावाशी कोणताही संबंध नाही
सध्या पांढरा समुद्र व भाट्ये येथे सापडणारे हे शिंपले तिसरे किंवा धामणे या प्रजात्तील शिंपल्यांचाच प्रकार आहे. हे सर्व शिंपले ‘पेंथिया’ शिंपल्यांच्या कुळातील ओळखले जातात. ते या किनास्त्यावर सर्रास आढळतात. पण प्रत्यक्षात त्यांचा चायनिज या नावाशी कोणताही संबंध नाही, ते लोकचर्चेने नाव घेतले जात आहे. कारण त्या शिंपल्यांना एक नक्षीदार असा ग्लेज आहे व ग्तीसी दिसतात प्रामुख्याने त्यांचा प्रजनन काळ हा सप्टेंबरपासून सुरू असतो. पण हवामानातील बदल, समुद्र प्रवाहातील चढ-उत्तार, तापमान बदल यांचा परिणाम या शिंपल्यांचा प्रजनन काळ मागे पुढे होत असल्याचे समोर येत आहे. कदाचित प्रजननात्ताती पोषक वातावरण असलेते भाग्य क्षेत्र अनुकूल वातावरणामुळे हे शिंपत्ते पांढरा समुद्र व माठ्ये किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात दिसत असल्पाचे पैवौल सागरी जीव अभ्यासक स्वप्ना मोहिते यांनी सांगितले








