वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. या भेटीत दोघांनीही शांततापूर्ण मार्गाने सत्ता सोपवण्याची प्रक्रिया पार पाडण्याची कटिबद्धता व्यक्त केली. ‘वेलकम बॅक’ म्हणत बिडेन यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. सत्ता सोपवण्याची ही वेळ संपूर्ण देशासाठी महत्त्वाची आहे, असेही बिडेन म्हणाले. प्रत्युत्तरादाखल ट्रम्प यांनी ‘सत्तेचे हस्तांतरण योग्यपणे करण्यासाठी आपलेही योगदान राहील’ असे स्पष्ट केले. मात्र, दोन्ही नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळले. ट्रम्प आणि बिडेन यांच्यासोबतची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया परंपरेतील हा एक महत्त्वाचा टप्पा असतो.









