तू गेलीस तोडुनी ती माळ सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात?
पंडित वसंतराव देशपांडे यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांमधील एक लोकप्रिय गाणं! पांढऱ्याशुभ्र बगळ्dयांच्या माळेची तुलना खरोखरच्या मोत्यांच्या माळेशी यात केलेली आहे. आणि शेवटचं कडवं हे आर्ततेची परिसीमा गाठतं. वास्तविक हे संपूर्ण गीतच विरहगीत आहे. आणि प्रत्येक कडव्यात हा विरह चढत्या क्रमाने जातो. आणि हे कारुण्य शेवटच्या अंतऱ्यात टिपेला जाऊन पोहोचतं. तिच्यातली अत्यंत सुरेख ओळ म्हणजे ‘फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे’ वा. रा. कांत यांची ही कविता म्हणजेच पंडितजींसारख्या सिद्ध स्वरभोगी कलाकाराच्या कंठातून आलेले हे गाणं अर्थातच ऐकणाऱ्याला कवितेचेही खूप नवे आयाम उघडून देत असलंच पाहिजे यात शंका नाही. पण मुळात ही कविताही फार सुंदर आहे. आणि कवितेतून कवीला जे काही सुचत असतं त्यापेक्षा खूपच वेगळी पातळी वाचक किंवा इथे गाणे ऐकताना श्रोता असा आपण म्हणूया, गाठू शकतो. बऱ्याचशा गाण्यांमध्ये घडतंच.
उत्तम कवितेचे वेगवेगळ्या पातळीवर जाऊन खूप सारे अर्थ लावता येतात. आणि हेच त्या कवितेचं किंवा हेच त्या गाण्याचं मोठेपण असतं. एकसंघ, अखंड असलेली माळ म्हणजेच एकसंध असलेलं त्यांचं नातं. सर्व रंग ज्या रंगात जाऊन विसर्जित होतात असा तो पांढरा शुभ्र रंग. बगळ्dयांचा रंग तसाच असतो. मोत्यांचा रंगही तसा असतो आणि त्या नात्याचा रंगही तसाच आहे. पारदर्शी, शुभ्र कोणताही कलंक नसलेला. पण परिस्थिती प्रत्येकवेळी अनुकूल नसते. म्हणूनच की काय एकसंध असलेली, अखंड असलेली ती मोत्यांची माळ एकाएकी तुटून जाते. त्याच्यातले एक एक मोती घरंगळायला सुरुवात होते. आणि घरंगळणाऱ्या मोत्यांचं जसं लयबद्ध पडणं किंवा एकाएकी समूह मोडून इकडे तिकडे बसत राहणाऱ्या त्या बगळ्dयांच्या शुभ्र पंखांचं फडफडणं आयुष्याला आलेला विस्कळीतपणा किती योग्य आणि सुरेख पद्धतीने दाखवतं नाही?
कधी कधी आयुष्याच्या खूप कोवळ्या वळणावर आकार घेत असलेलं एखादं अतिशय समृद्ध, श्रीमंत नातं आणि भविष्यात एकमेकांचे जोडीदार म्हणून आयुष्य वेगळ्dया उंचीवर नेऊ शकणारी उच्च अभिरुचीची माणसं काही कारणाने जेव्हा एकत्र येऊ शकत नाहीत तेव्हा मखमलीवर सांडलेल्या मोत्यांच्या माळेतल्या मोत्यांसारखे ते शांतपणे एकमेकांपासून अलग होतात. मखमलीवर सांडलेल्या मोत्यांचा आवाज येत नाही. मखमलीवर विखुरलेले मोती जितके देखणे दिसतात तितकंच त्यांच्या नात्याचं विखरून जाणंसुद्धा देखणं असतं. कारण त्या व्यक्तींनी आयुष्यात विशिष्ट उंची गाठलेली असते. त्या सुसंस्कृत असतात. त्यामुळे नात्यांचं तुटणं आणि नव्या वळणाची अपरिहार्यता ती तितक्याच शांतपणे किंवा समजूतदारपणे स्वीकारतात. उगीचच आकांडतांडव करीत नाहीत. आक्रस्ताळेपणा करीत नाहीत.
पदरी आलेल्या जोडीदाराला किमान सन्मानाने तरी वागवतात. त्यांच्या पावलांनी रांगोळी विस्कटली तरीही ती देखणी दिसेल, इतकं त्या माणसांचं जगणं सुसंस्कृत असतं आणि त्यांचं स्पर्शभान फार तरल असतं. परंतु प्रेम हे शेवटी प्रेमच असतं. आयुष्यात अशा अनेक अंधारवाटा येतात. अशी अनेक अवघड वळणे येतात जिथे माणसाचा तोल सुटतो. जिथे माणसाच्या अंतराला खोलवर घाव होतात. जखमांचा गहिरेपणा वाढत जातो. त्या जखमा सुगंधी असल्या तरी त्या सुगंधी कुपीतून दरवळ बाहेर येऊ देणं परवडणार नसतं.
अशावेळी स्वत:ची समजूत स्वत: काढावी लागते. म्हणून एखाद्या बागेत, एखाद्या मळ्यात शांतपणे बसलेला तो, गतायुष्यातील तिच्याबरोबरच्या आठवणी जेव्हा मनातून बाहेर वाहू देत असतो तेव्हाची अभिव्यक्ती म्हणजेच हे गाणं असं वाटतं.
कदाचित ती सुद्धा तिच्या भल्या मोठ्या घराच्या शिसवी झोपाळ्यावर एकटीच बसून शांतपणे झोके घेता घेता त्याला आठवत बसलेली असते. तिच्या आठवण्यात वखवख नसते. असोशीही राहिलेली नसते. ना कुठे वेदना असते ना हताशा. ती फक्त आठवण असते. शुभ्र रंगाइतकीच शुभ्र नितळ! इतर कुठल्याच रंगाचा एक थेंबही नसलेली ती आठवण देवापुढे लावलेल्या समईच्या ज्योतीसारखी किंवा बागेतल्या अनंताच्या फुलासारखी कदाचित. अनाघ्रात आठवण असते ती. स्त्राr ही सोहाच असते. सगळं काही सहन करणारी, पचवणारी. नदी जशी वाटेतल्या खाचखळगे, अडचणी या सगळ्dयांसोबत वाहून वाहून खोल होत जाते. आणि संथ, शांत होते. स्त्राrचं आयुष्य असंच असतं. त्यामुळे तिच्या मनाला तिच्या अस्तित्वाला आयुष्य जसं पुढे जाईल तशी एक अर्थपूर्ण शांतता संथता आलेली असते.
कदाचित त्यामुळे असेल पण तिला आपली आठवण येत असेल का याविषयी साशंकता असते त्याच्या मनात. मग त्याला त्यांचं सहजीवन आठवतं आणि तेव्हाच वातावरणही फार सुंदर तरल आहे ‘छेडिती पानात बीन थेंब पावसाचे’. पावसाचे थेंब पानावर पडून त्यांचा असा आवाज येतो आहे की जणू बीन वाजतेय. आणि श्रावणाचा पाऊस असेल कदाचित. त्यामुळे अभ्रकासारखं चकचकीत ऊनही त्या ओल्या रानावर पडलेलं असतं आणि लांब कुठेतरी डोंगरात एखादा घन घुमत असतो, बरसत असतो. तिची आठवण मनाला वेढून टाकण्यासाठी हे वातावरण पुरेसं नसतं का? आणि मग नारळीच्या झाडाखाली झालेल्या भेटी, तिच्या डोळ्यातून त्या वेळेला उजळलेली पौर्णिमा, आणि त्या पौर्णिमेतलं जे अमृतसिंचन असतं त्याचा गारवा आजही त्याच्या विकल मनाला संजीवनी देत असतो.
आज जी बगळ्dयांची माळ बघून कसा जीव कासावीस होतो, त्या बगळ्dयांच्या माळेतले बगळे दोघांनी मिळून मोजलेले असतात. शुभ्र कळ्dयांसारखे दिसणारे ते बगळे त्या सुगंधी आठवणी जाग्या करीत असतात. त्यावेळीचं आयुष्य तळ्dयातल्या कमळासारखं सुगंधी होतं. आणि तळ्याच्या पाण्यासारखाच वाहतेपणा, पारदर्शित्व आणि जिवंतपणा आयुष्याचा तेव्हा एक भाग होता. आता मात्र आयुष्यातला तो भाग मागेच सोडून एका फार वेगळ्या वाटेवरून त्या दोघांचाही वेगवेगळा प्रवास सुरू आहे आणि तिला कळवळून साद घालतो कदाचित तिच्याही विकल अंतरात ती साद सहज पोहोचली असेल. पण ती पोचली आहे हे त्याला कळवण्याइतका मोकळेपणा तिच्यात राहिलेला नसेल. स्त्राrच्या ओठांना बंधनंच फार असतात. तिची साद न आल्यामुळे तळमळणारा जीव त्यावेळी मात्र आर्तपणे उद्गारतो.
‘तू गेलीस तोडुनी ती माळ सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे’ कारण हे फडफडणं विरहाच्या वेदनेनेसुद्धा होतं. नात्याच्या जात्या जीवाची ती शेवटची तडफड असते. म्हणून विस्कळीत झालेली बगळ्dयांची माळ दिसताच विस्कटून गेलेलं नातं आठवावे यात नवल ते काय फक्त हे फडफडणे शुभ्र असतं आणि अखेरपर्यंत ते निष्कलंक शुभ्रच राहतं हे मात्र खरं.
अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु








