White Bread Harmful: अनेकांना सकाळच्या नाश्त्यात सँडविच किंवा भाजलेला ब्रेड खायला खूप आवडतो. यासाठी बहुतेक घरांमध्ये पांढऱ्या ब्रेडचा वापर केला जातो.पण तुम्हाला माहित आहे का की व्हाईट ब्रेड खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होत असतात. बाजारात ब्राऊन ब्रेड उपलब्ध असतो. मात्र बरेचजण पांढऱ्या ब्रेडला पसंदी देतात. पांढऱ्या ब्रेडमध्ये मैद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सतत मैदा पोटात गेल्याने पोटाच्या गंभीर आजाराचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया व्हाईट ब्रेड खाण्याचे काय तोटे आहेत?
बद्धकोष्ठता- रोज पांढरा ब्रेड खाल्ल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेशी संबंधित समस्या होऊ शकतात.कारण या ब्रेडमध्ये मैद्याचा वापर केला जातो. मैदा पचायला जड असतो. हे पीठ पोटात खूपवेळ चिकटून बसते.त्यामुळे पोटदुखी,जुलाब सुरू होतात. शिवाय पांढऱ्या ब्रेडमध्ये मोठ्या प्रमाणात ग्लूटेन असते,ज्यामुळे यकृत खराब होऊ शकते.
हाय बीपी- आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की व्हाईट ब्रेड जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात रक्तातील साखर वाढू लागते.जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर पांढऱ्या ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खा.
वजन वाढणे- जर तुम्ही रोज सकाळच्या नाश्त्यात व्हाईट ब्रेड खाल्ला तर वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.वास्तविक, व्हाईट ब्रेडमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते.ते चरबीच्या रूपात शरीरात साठवले जाते.जे खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.
मानसिक आरोग्य- संशोधनानुसार,जे लोक रिफाइंड कार्ब्सयुक्त पदार्थांचे अधिक सेवन करतात त्यांच्यामध्ये नैराश्यासारखी समस्या अधिक असते. त्यामुळे तुम्ही व्हाईट ब्रेडचे सेवन टाळावे. आजपासून पांढऱ्या ब्रेडऐवजी घरात ब्राऊन ब्रेड आणायला सुरुवात करा आणि आजारांपासून दूर राहा.
Disclaimer: वरील माहिती ही सर्व साधारण माहितीवर आधारीत आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहचवणे एवढाच आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









