कोणतेही खाण्यायोग्य फळ विकले जात नाही, ही बाब आपल्या प्रत्येकाला आश्चर्य वाटण्यासारखीच आहे. पण असे एक फळ आहे, जे कोणत्याही बाजारात विकले जात नाही. कोट्यावधी रुपये मोजण्याची आपली तयारी असली तरी ते विकले जाऊ शकत नाही आणि विकत घेताही येत नाही. कोड्यात टाकणारीच ही बाब आहे. असे कोणते ही फळ आहे की जे विकत मिळत नाही ?
सध्या सोशल मिडियावर या प्रश्नाने धुमाकूळ घातला आहे. लोक हा प्रश्न पाहून बराच विचार करतात. डोके खाजवितात. पण त्यांना या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. हे फळ अत्यंत गोड असते. पौष्टीकही असते आणि ते आपल्याला मिळाले तर आपली ददात मिटण्यासारखी असते. पण ते आहे तरी कोणते ?
तर त्याचे उत्तर आहे, ‘सब्र का फल’, अर्थात संयम किंवा सबुरीचे फळ. हे फळ कोणत्याही बाजारात किंवा फळविक्री केंद्रावर मिळत नाही. मात्र, ते मिळविण्यासाठी प्रयत्नही सोडून चालत नाही. बऱ्याच कष्टांच्या नंतर ते हाती लागते. जेव्हा हाती लागते तेव्हा ते आपले आयुष्यभराचे कल्याणही करु शकते. त्याची चव न्यारीच असते. म्हणूनच तर ‘सब्र का फल मीठा होता है’ अशी म्हण प्रचलित झाली आहे. हे उत्तर जेव्हा सोशल मिडियावर आपल्याला पहायला मिळते तेव्हा आपण आवाक् होते. अनेकांनी असा हा अनुभव सोशल मिडियावर शेअर केला आहे.









