कोल्हापूर / राजेंद्र होळकर :
मोक्याच्या गुह्यात तब्बल सहा वर्षे फरारी कोल्हापूरातील मटकाकिंग सम्राट कोराणे बुधवारी स्वत:हून न्यायालयाच्या माध्मयामातून शरण आला. मात्र फरारी काळात त्याला कोणी आणि कोठे आश्रय दिला. गोव्यासह कोल्हापूरातील एका बड्या राजकारण्याच्या वरदहस्ताने कोराणे पोलिसांना चकवा देत होता. येत्या काळातपोलीस तपासात यासर्व बाबी समोर येणार आहेत. या प्रकरणात आपले नाव येवू नये. यासाठी पडद्यामागील त्याचे गाडॅफादर सक्रिय झाले आहेत.
गुन्हेगार कोराणेसह चौदाजणांनी पोलिसांनी केलेली ‘मोक्का‘ची कारवाई रद्द करावी, या मागणीसाठी बारा याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या होत्या. यासर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या होत्या. त्यानंतर त्याने विशेष मोका न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी प्रयत्न केले. पण न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिनअर्ज फेटाळून लावीत, त्याला फरार घोषित केले. त्याचा पोलिसांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचा ताण असताना देखील शोध घेतला. पण तो मिळून आला नव्हता. तो गोव्यात असल्याच्या माहितीवऊन पोलिसांनी अनेक वेळा गोव्यात धाव घेवून शोध घेतला. तरीदेखील तो मिळून आला नाही.
- पोलिसांच्या धास्तीने वडीलाच्या अंत्यदर्शनाला आला नाही
तो फरारी असताना त्याच्या वडीलाचा मृत्यु झाला. तो वडिलाचे अंतिमदर्शन घेण्यासाठी येईल. त्यावेळी त्याला पकडून अटक करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे यांचे एक विशेष पोलीस पथक शिवाजी पेठ आणि स्मशानभूमी परिसरात तैनात केले होते. याची माहिती समजतात गुन्हेगार सम्राट कोराणेने वडीलाच्या अंत्यदर्शनासाठी आलाच नाही. तरीसुध्दा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांच्याकडून त्याला अटक करण्यासाठी त्याचे लोकेशन शोधण्यासह त्याचे आश्रयदाते कोण–कोण आहेत. याची माहिती घेवून, समजलेल्या ठिकाणी छापा टाकून त्याला पकडण्यासाठी सहा वर्षे प्रयत्न करीत होते. तरीसुध्दा पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे त्याला फरारी काळात कोणी आणि त्याने कोठे आश्रय घेतला. अशा आश्रयदातांना देखील मोक्याच्या गुह्यात आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांच्या रडारवर आश्रयदाते येणार आहेत, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
- पोलीस उपाअधीक्षक कट्टे याचा पोलीस महासंचालकाकडून गौरव
मटकाकिंग सलीम मुल्ला गँगवरील मोकातंर्गत गुह्याचा दैनदिन कामाचा व्याप सांभाळत. या गुह्याचा खोलवर जाऊन तपास कऊन, तब्बल 44 संशयितांवर ठोस पुराव्यानिशी दोषारोपपत्र दाखल करण्याचे उल्लेखनीय काम तत्कालीन शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी केले. मटका व्यवसायाचे कोल्हापूर, सांगली, मुंबईसह गुजरात, गोवा कनेक्शन उघड करून, 44 पैकी 42 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. या कामाबद्दल पोलीस उपाअधीक्षक कट्टे यांचा पोलिस महासंचालकांकडून गौरव करण्यात आला. या तपासाबद्दल त्यांच्या तपासी पथकाला त्यांच्याकडून एक लाख रूपयांचे बक्षीस देण्यात आले होते. तसेच मटक्या सारख्या अवैध धंदेवाल्यांवर केलेल्या कारवाईबद्दलचे उल्लेखनीय तपासाबाबत एका महिला पोलिस अधिकाऱ्यांना मिळालेले हे जिह्यातील पहिलेच बक्षीस आहे.








