कोल्हापूर:- राज्यात महाविकासआघाडी मध्ये भूकंप होत असून शिवसेनेचे (shivsena) काही आमदार नॉटरिचेबल आहेत. ते गुजरात मधील सुरत येथे एका हॉटेलात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये कोल्हापुरातील राधानगरीचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर (Prakashrao Abitkar) हे देखील मंत्री शिंदे (ekanath shinde) यांच्यासोबत आहेत. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मराठवाडा, कोकण, ठाण्यातील किमान वीस आमदारांसह शिवसेनेचे नगर विकास मंत्री तसेच ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे हे थेट काल रात्री सायंकाळपासून नॉट रिचेबल असून ते थेट गुजरातच्या सुरतमधील हॉटेल मेरिडिअनमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर हे सर्व आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर कोल्हापूरचे शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर हे ही नॉट रिचेबल असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर आबिटकरांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते तेंव्हा पासून नाराज होते, असे बोलले जात आहे. सध्या प्रकाश आबिटकर हे एकनाथ शिंदेंसोबत सुरतमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









