कोल्हापूर :
जिह्यात ऑक्टोबरमध्ये सर्व गावांमध्ये पाणी स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 68 गावांत मध्यम जोखीम व साथरोग उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मध्यम जोखीम असलेल्या ग्रामपंचातीमध्ये वाढ आहे. त्यामुळे सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या त्रुटींचे निराकरण करुन मध्यम जोखीम (पिवळया कार्ड) चे रुपांतर सौम्य जोखीम (हिरव्या कार्ड) मध्ये करून त्याबाबतचा खुलासा आणि अहवाल पाठवावा, असे आदेश सीईओ कार्तिकेयन एस. यांनी सर्व तालुक्यांतील गटविकास अधिकाऱ्यांना दिले हेते. पण त्यानुसार कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे त्यांनी पुन्हा 17 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करा, अन्यथा प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारावजा आदेश दिला.
अतिसार, काविळ. कॉलरा 1 आदी जलजन्य आजारांचा का होतोय उद्रेक ?
जानेवारी 2024 ते आजअखेर 28 गावांमध्ये साथ रोगांचा उद्रेक झाला. त्यापैकी जलजन्य आजाराचे एकूण 15 उद्रेक झाले. काविळ-11, कॉलरा-1, अतिसार-3 आदींचा साथ उद्रेकांमध्ये दूषित पाणी पुरवठा, व्हॉल्व, नळगळती, ब्लिचिंग पावडर नियमित न वापरणे, प्रक्रिया करण्यासाठी पुरेसा अवधी न देणे तसेच दूषित स्त्राsंतातून पाणी मुख्य स्त्राsतामध्ये मिसळणे. टाकीतून गावांला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन, व्हॉल्वला असलेली गळती, स्त्राsतापासून ते टाकीपर्यंतची तसेच गावांला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन गटारीजवळून अथवा गटारीतून गेलेल्या असल्याने इतर दुषित स्त्राsताचे पाणी मुख्य स्त्राsतात मिसळतात. कांही गावामध्ये ओढयांचे पाणी मुख्य स्त्राsतात मिसळून पिण्याचे पाणी दुषित होवून जलजन्य आजाराचा, साथरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. टाक्यांची दरमहा स्वच्छता न करणे तसेच साठवण टाकीस गळती असणे. पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्त्राsताजवळ व मुख्य व्हॉल्वजवळ अस्वच्छता असणे. तसेच दुषित पाण्याचा व्हॉल्व गळतीतून निचरा होणे आदी कारणे जलजन्य साथ रोगांच्या प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली. त्यामुळे ग्रामपंचायतींनी त्याबाबतची दक्षता घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी केले आहे.
कारणांची योग्य मिमांसा शोधून त्यावर तत्काळ कार्यवाही करुन स्थानिक नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करणे सूचना व संबंधित प्रक्रिया करण्याचे आदेश सीईओ कार्तिकेयन एस. यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तसेच त्रुटींचे निराकरण वेळेत न केल्यास ग्रामपंचायतीकडील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा घेण्याच्या सूचनाही सीईओंनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार अहवाल 2 डिसेंबर 2024 अखेर द्यायचा होता. तो न दिल्यामुळे सीईओंनी पुन्हा त्याबाबतचा आढावा घेऊन 17 डिसेंबरपर्यंत खुलासा आणि अहवाल पाठविण्याचे आदेश सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा सीईओंनी दिला आहे.
साथ रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीईओ अलर्ट
जिह्यात जानेवारी 2024 ते आजअखेर 26 गावांमध्ये साथरोगाचा उद्रेक झाला. त्यापैकी जलजन्य आजारांचे एकूण 17 उद्रेक झाले आहेत. त्यामुळे या साथरोगांचा वेळोवेळी होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सीईओ कार्तिकेयन एस अलर्ट झाले असून संबंधितांना सूचना दिल्या जात आहेत. पण ग्रामपंचायत आणि तालुका पातळीवरून त्याबाबत गंभीरतेने कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे.








