बेळगाव – आज विधानसभेच्या अधिवेशनात बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी बेळगावात 14 वसतिगृहे बांधण्याच्या प्रलंबित प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला. बेळगावला उपराजधानी म्हटले जाते. विविध ठिकाणचे विद्यार्थीही शिक्षणासाठी मोठ्या संख्येने बेळगावात दाखल होतात. बेळगावला शिक्षणाचे केंद्र म्हटले जाते. शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 11 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे १४ वसतिगृह बांधकाम प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यांचा निकाल कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला.
यावर गृहनिर्माण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी म्हणाले, सद्या 2438 वसतिगृहे आहेत परंतु विद्यासिरी योजनेअंतर्गत सुमारे 1,20,000 विद्यार्थी वसतिगृहाबाहेर शिक्षण घेत आहेत. विद्यासिरी ही अशी योजना आहे ज्या अंतर्गत विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च सरकारच भरते. 25% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बीसीएम वसतिगृहांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे 30 हजार विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला आहे. दीनदयाळ उपाध्यय योजनेंतर्गत बेळगावमध्ये 1000 विद्यार्थ्यांसाठी शाळा मंजूर करण्यात आली आहे. त्यात 200 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, उर्वरित 800 विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे. आगामी अर्थसंकल्पात अधिक निधीच्या आधारे उर्वरित 14 प्रस्तावांना मंजुरी देण्याचे आश्वासन देण्यात आले .
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









