नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा : शिवाजी उद्यानातील खुल्या वाहिन्यांमुळे धोका

प्रतिनिधी /बेळगाव
शहापूर येथील शिवाजी उद्यानात पथदीपांसाठी लावण्यात आलेल्या फ्युजपेटय़ा खुल्या असून, यामुळे कोणाला विजेचा धोका पोहोचेल याची शाश्वती नाही. दररोज शेकडो नागरिक व लहान मुले मॉर्निंग वॉक व खेळण्यासाठी येत असतात. त्यामुळे त्यांना धोका पोहोचण्याची शक्मयता आहे. याचा विचार करून महानगरपालिकेने येथील फ्युजपेटय़ांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शहरात अनेक ठिकाणी खुल्या फ्युजपेटय़ा असल्यामुळे विद्युतवाहिन्या बाहेर आल्या आहेत. यामुळे धोका निर्माण झाला आहे. फ्युजपेटय़ांना बसविण्यात आलेले दरवाजे चोरून घेऊन जाण्यात येत असल्याने महानगरपालिकाही हतबल झाली आहे. अशीच परिस्थिती शिवाजी उद्यान येथे झाली आहे. शिवाजी उद्यान येथे लावण्यात आलेले डेकोरेटीव्ह पथदीप यांच्या मुळाशी असणाऱया पेटय़ांचे दरवाजे काढण्यात आले आहेत. यामुळे सर्व वाहिन्या बाहेर पडल्या असून, एखाद्या लहान मुलाने त्याला स्पर्श केल्यास अनर्थ घडण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
दुरुस्ती करण्याची मागणाr
विद्युत वाहिन्या बाहेर पडल्या असल्याने त्याला नकळत कोणाचाही स्पर्श होऊ शकतो. तसेच कर्मचाऱयांनी बऱयाच ठिकाणी त्याला जोड दिली असून, तेथे शॉक लागण्याची शक्मयता आहे. शिवाजी उद्यान येथे शिवभक्तांची नेहमी ये-जा असते. त्यामुळे एखाद्या निष्पापाला जीव गमवावा लागला तर याची जबाबदारी महानगरपालिका घेणार का? असा संतप्त सवाल नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.









