कित्येक वर्षापासून महापालिकेचे दुर्लक्ष
बेळगाव : स्मार्ट सिटी बनवत असताना एकीकडे सुस्थितीत असलेल्या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि दुसरीकडे मात्र वर्षानुवर्षे निर्माण झालेला खड्डा बुजविण्याकडे कानाडोळा केला आहे. गांधीनगर परिसरात निर्माण झालेल्या ख•ा बुजविण्याची मागणी करण्यात आली होती. पण हा खड्डा बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांना धोकादायक बनला आहे. गांधीनगर परिसरात लाकडाचे अ•s असलेल्या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला असून हा खड्डाआहे की, ड्रेनेज चेंबर, हे लक्षात येत नाही. पण रस्त्याशेजारी असलेला हा खड्डा नागरिकांना धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून अनेक वाहने ये-जा करीत असतात. तसेच लहान मुलेदेखील सायकलवरून या मार्गे जात असतात. त्यामुळे हाखड्डा बुजविणे गरजेचे आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडे तक्रार देऊनही ख•ा बुजविण्याकडे कित्येक वर्षापासून दुर्लक्ष केले आहे. लहान मुले खेळताना पडण्याचा धोका आहे. कोणताही अनर्थ घडू नये, म्हणून या दृष्टीने नागरिक सातत्याने दक्षता घेण्याचा प्रयत्न करीत असतात. पण महापालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्याच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना राबविल्या जात नाहीत. अनेकवेळा वाहनेदेखील अडकण्याचा प्रकार घडत असतो. याठिकाणी मोठा अनर्थ घडण्याची प्रतीक्षा महापालिकेचे अधिकारी करीत आहे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. कित्येक वर्षांपासून निर्माण झालेला हा ख•ा कधी भरणार? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.









