Whats App Down: मोबाइलधारकांसाठी अत्यावश्यक असलेली व्हॉट्स अॅपची सेवा काही वेळापूर्वी बंद (Whats App Down) पडली आहे.अनेक ठिकाणी युजर्सना ही अडचण जाणवत आहे.मेटा कंपनीकडून या तांत्रिक समस्येबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.मात्र,सेवा पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.
साधारण दुपारी 12.30 नंतर ही सेवा खंडित झाली. सुरुवातीला नेट प्राब्लेम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. व्हॉटस अॅपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्याने थोडावेळ गोंधळ निर्माण झाला. यानंतर सोशल मीडियावर याबाबत विचारणा सुरु झाली.त्यानंतर काही वेळात ट्वीटरवर #WhatsAppDown चा ट्रेंड सुरू झाला.यानंतर मात्र व्हॉट्स अॅपची सेवा बंद पडल्याची खात्री पटली.
Downdetector ने दिलेल्या माहितीनुसार,69 टक्के युजर्सना मेसेज करण्यात अडचणींना सामोरे जावे लागले.तर, 21 टक्के युजर्सकडून इंटरनेट कनेक्शनबाबत समस्या जाणवत होती.तर,9 टक्के युजर्सना इतर समस्या जाणवत होत्या.सुरुवातीला,व्हॉट्स अॅपमधील ग्रुपमध्ये मेसेजचे आदान-प्रदान करण्यात युजर्सना अडचणी जाणवत होत्या.त्यानंतर वैयक्तिक मेसेजही पाठवण्यास अडचणी येऊ लागल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









