सहज म्हणून भटकंती करण्यास एखाद्या स्थानी जावे आणि तेथे अत्यंत अद्भूत असे काहीतरी ध्यानीमनी नसताना सापडावे, अशा घटना अनेकदा घडतात, हे सर्वपरिचित आहे. पृथ्वीवरच्या अनेक रहस्यांचा भेद हा अशा प्रकारे अचानकपणे झाले आहे. खेडेगावांमध्ये मातीची घरे असतात, हे आपल्याला माहीत असते. अशाच एका मातीच्या घराने एका रहस्यावरचा पदडा हटविला आहे.
सर्वसाधारणपणे अशी मातीची घरे एकाच मजल्याची असतात. सध्या अशा एका घराची माहिती सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली आहे. एक युवती असेच एक घर कुतुहलाने पाहण्यासाठी गेली होती. या मातीच्या घरात तिला एक तळघर आढळले. तिने उत्सुकतेपोटी या तळघराचा दरवाजा ओलांडून आत प्रवेश केला आणि तिच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. या तळघरातला अनेक खोल्या होत्या आणि एक अंगणही होते. बाहेरुन हे तळघर अगदीच लहान दिसत होते. तथापि, आत गेल्यानंतर ते मूळ घरापेक्षाही मोठे असल्याचे पाहून ती आश्चर्यचकित झाली.
या तळघरातील घरात आपल्याला राहण्यासाठी योग्य अशा अनेक वस्तू होत्या. एका खोलीत तर तिला फ्रीजही ठेवलेला आढळला. मात्र, तो चालतो कसा हा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला. कारण वीजेची जोडणी कुठे दिसत नव्हती. इतकी साधने या घरात असूनही तेथे कोणाचा वावर नव्हता, ही अधिकच आश्चर्याची बाब होती. तसेच मूळ घर सुरक्षित असताना तळघरात इतक्या सुखसोयी का आहेत, हाही प्रश्न आहे. आता या तळघरावर अधिक संशोधन केले जात आहे.









