राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जे काही आरोप केले ते आता खरे ठरत असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. नवाब मलिक य़ांचा सत्य बोलल्यामुळेच खुप छळ करण्यात आला असल्य़ाचेही ते म्हणाले.
गेले काही दिवसापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर बॉलीवूडचा अॅक्टर शाहरूख खान याच्याकडून 25 कोटीची लाछ घेतल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. हि लाच शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ह्याला कार्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात कायद्याच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी दिली असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांना सीबीआय़च्या चौकशीला सामोरे जाव लागत आहे.
यापुर्वी दाऊद इब्राहिम यांची मालमत्ता खरेदी प्रकरणात नवाब मलिक यांची चौकशी झाली. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2022 पासून नवाब मलिक तुरुंगात आहे. या प्रकरणाची चौकशी समीर बानखेडे यांनी केली होती. त्यानंतर 2021 मध्ये कार्डेलीया क्रूझवरील ड्रग्जची चौकशी सुरू असताना नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याचाच संदर्भ देत शरद पवार यांनी “ नवाब मलिक जे आरोप करत होते ते खरे ठरले आहे. सत्य बोलल्यामुळे त्यांचा छळ करण्यात आला” असे त्यांनी म्हटले आहे. नवाब मलिकने ड्ग्ज प्रकरणादरम्यान समीर वानखेडेचा धर्म, जात, पहिला विवाह आदींबाबत अनेक स्फोटक दावे केले होते.









