विहे :
पावसानं औवंदा आबदा लयं केलीया बघा, झोपायचं, जेवणाचं, राहण्याचं, ओंघाळीचं मरणाचं हाल सुरु हायतं. आम्हाला कसला जन्म घातलाय देवानं अशी खंत म्हसवड-दिवड गावच्या मेंढपाळ आकुबाई बाळू दिडवाघ यांनी व्यक्त केली.
सातारा, कराड, पाटण तालुक्यात माण, खटाव तालुक्यासह कोल्हापूर भागातील बाळुमामाची मेंढरे असे मिळून पाचशेपेक्षा जास्त बाडे असतील. त्या सर्व वाड्यांचे गेल्या पंधरा दिवसापासून पावसामुळे असेच हाल सुरू असणार आहेत. सात जूनच्या दरम्यान मान्सून पाऊस सुरू झाला की सर्व मेंढपाळ परतीच्या प्रबासाला लागतात. बसत उठत घरी पोहोचायला जवळजवळ एक महिना जातो. मात्र चालू वर्षी वळीव पाऊस १५ दिवस राहिल्यामुळे जनावरांसह माणसांचे मरणाचे हाल झाले आहे. जळण ओले असल्याने जेवण बनवताना त्रास होत आहे. रात्रभर जागरण करून बिबट्या व तरसापासून राखण करावी लागत आहे. बाड्याला जनावरांचे भ्या मोठे आहे. झोपायचा प्लास्टिक कागदाचा निवारा केला. मात्र आडव्या वाऱ्यामुळे रात्रीचा पाऊस चालू असला तर रातभर दोन पायावर बसून दिवस काढले आहेत सतत पडणारे पावसामुळे बाडा हलविला नाही. पावसामुळे शेतात पाणी असल्याने शेतकरी शेताचा तुडवा होत असल्यामुळे बाडा बसवत नाही. मोबाईल आहे पण चार्जिंग करता येत नाही.
प्रत्येक वाडा गावोगावच्या वाडया बस्तीबर असतात. ज्या त्या गावाला पाच सहा बाडे असतात. मात्र चालू वर्षी पावसाने १५ दिवस अगोदर निघालो आहे. सात जून नंतर पाऊस सुरू झाला की परतीचा प्रवास सर्व बाडे घरी निघत असे. आमच्याकडे पाणी नसतं म्हणून जात नाही. त्यामुळे आमचा मुक्काम बाढत असतो. मात्र यंदा गावाकडे पाणी आल्याचे समजते.
- परतीचा प्रवास सुरू करतोय…
१५ वर्षापासून चित्रापे घेऊन येत आहे. मात्र चालू वर्षी बळीव पाऊस सुरू असल्यामुळे १५ दिवस लय हाल झाले. आर्थिक घडी बिघडली आहे. चिखलात जित्राप घालायचे म्हटले तर भ्या वाटतय. जित्राप तादून जात आहे. आमच्याकडे या दिवसात पाणी प्यायला नसते. मात्र चालू माणगंगेला पूर आला आहे. आम्ही परतीचा प्रवास सुरू केला असला तरी उंब्रज, रिसवडचे दोन मुक्काम त्रास देतात.
बाळू विठोबा दिडवाघ, मेंढपाळ
- असा सलग वळीव पाहिला नाही…
रात झाले की कसलेही पाणी पितो. एका जागेवर खडकावर डोंगराकडेला तीन दिवस गबाळ सोडून बसलो आहे. पावसाने सकाळी ६ बाजल्यापासून ४ तास झाले चुली धुपत आहे. परवा जळण आणले तरी पेटत नाही. लग्नाला इशाक वर्ष झाली त्या दिवसापासून येत आहे पण असा वळीव पाऊस कधी झाला नाय पडला.
मुक्ताबाई भारत कोळेकर, म्हसवड








